News Flash

Viral Video : डॉक्टरांनी केला सलमानच्या ‘सिटी मार’ या गाण्यावर डान्स

दिशाने पटानीने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट १३ मे रोजी ईदच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला. ‘राधे’ प्रदर्शित होताच त्याने अनेक रेकॉर्ड तोडले. चित्रपटातली गाणी तर प्रचंड लोकप्रिय झाली. नेटकरी चित्रपटातील वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करत ते व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ अभिनेत्री दिशा पटानीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दिशाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओत डॉक्टरांची टीम डान्स करताना दिसत आहे. ते सर्व ‘सीटी मार’ या गाण्यावर डान्स करत असल्याचे दिसत आहे. दिशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्यांचा हा व्हिडीओ शेअर केला होता, आणि त्याला कॅप्शन देतं ती म्हणाली, “रीयल हीरोज.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Team Disha (@teamdishap)

आणखी वाचा : ‘यांचा रुपयाही घेऊ नका’, अमिताभ यांना २ कोटी परत देण्याची परमिंदर सिंग यांची मागणी

गुरुवारी ‘राधे’ प्रदर्शित झाला आणि दुबईत चक्क सलमानचा चित्रपट पाहण्यासाठी लोकं २-३ तास आधी येऊन चित्रपटगृहाच्या तिकीटासाठी रांगेत उभे होते. मात्र, हा चित्रपटा अनेकांच्या पसंतीस उतरु शकला नाही. तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर राधेने सगळे रेकॉर्ड तोडले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 7:25 pm

Web Title: doctors dancing to salman khan radhe song seeti maar disha patani shares video dcp 98
Next Stories
1 प्राजक्ता गायकवाडच्या ‘लॉकडाउन लग्न’ला सुरुवात, शेअर केला व्हिडीओ
2 ओळखलत का चिमुकल्याला? आज आहे बॉलिवूडमधील लोकप्रिय मॉडेल, अभिनेता
3 सलमानच्या ‘राधे’मध्ये एका माजी सैन्य अधिकाऱ्याने साकारली खलनायकाची भूमिका
Just Now!
X