News Flash

शाहिद कपूरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार?

या छायाचित्रात मीराचे ‘बेबी बम्प’ दिसल्याचे संकेत मिळत आहेत.

Mira Rajput : शाहिद आणि मीरा गेल्या वर्षी जुलै महिन्यात विवाहबंधनात अडकले होते.

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची चाहुल लागली आहे. नुकत्याच झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये मीरा राजपूतने रॅम्पवॉक केले. यावेळी मीराने मसाबा गुप्ताने डिझाईन केलेला अटायर तिने परिधान केला होता. मसाबा हिने रॅम्पवरील मीराचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या छायाचित्रात मीराचे ‘बेबी बम्प’ दिसल्याचे संकेत मिळत आहेत. याशिवाय, छायाचित्रासोबत मसाबाने “Two M’s and a Bum #sayheytobey – little M (sic).” ( ‘दोन एम अँण्ड अ बम, लिटल ‘एम’ला हेल्लो करा’) असा संदेशही लिहला आहे. मात्र, मसाबा आणि मीरा दोघींचंही नाव ‘एम’वरुन सुरु होत असल्यामुळे नक्की कोणाचं बेबी बम हे स्पष्ट होत नाही. मात्र, या सूचक संदेशामुळे मीरा गर्भवती असून लवकरच शाहिदच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. शाहिद आणि मीराने याबद्दल अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शाहिद आणि मीरा गेल्या वर्षी जुलै महिन्यात विवाहबंधनात अडकले होते.

#Repost @mira.kapoor with @repostapp. ・・・ Two M’s and a Bum #sayheytobey – little M 💗

A photo posted by Masaba (@masabagupta) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2016 1:32 am

Web Title: does masaba instagram post confirms mira rajput pregnancy
Next Stories
1 ‘त्या’ ट्विटवरून प्रियांका चोप्राच्या आईने मॅनेजरला खडसावले!
2 ‘त्या’ चौघांसोबत आलियाचा रोमान्स!
3 पाहा ‘अझर’ चित्रपटाचा ट्रेलर!
Just Now!
X