News Flash

अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर कुत्र्याने केला हल्ला; करावी लागली प्लास्टिक सर्जरी

"अभिनेत्री म्हणते यापुढे मी प्राण्यांचा व्देशच करेन"

सना मकबूल छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सना आपल्या हॉट आणि स्टाईलीश अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. तिचे मादक फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. परंतु यावेळी ती कुठल्याही फोटोमुळे नाही तर चक्क कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आहे. एका कुत्र्याने तिच्या चेहऱ्याचा चावा घेतला होता. ही धक्कादायक माहिती स्वत: सनाने दिली आहे.

अवश्य पाहा – राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात पॉर्नस्टार; हा पाहा चित्रपटाचा टीझर

सनाने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी एक पत्र पोस्ट केलं आहे. “माझी चिंता करण्यासाठी धन्यवाद. मी लवकरच ठिक होईन. मी गायब झालेली नाही. खरं तर माझा एक लहानसा अपघात झाला होता. त्यामुळे बरेच दिवस मी तुमच्यासमोर येउ शकले नाही. एक व्यक्ती आणि अभिनेत्री म्हणून तुमचा चेहरा अत्यंत महत्वाचा असतो. एका कुत्र्याने माझ्या चेहऱ्याचा चावा घेतल्यामुळे मला शस्त्रक्रिया करावी लागली आहे. एक मुलगी जी प्राण्यांवर प्रेम करत होती, ती आता त्यांचा व्देश करु लागली आहे. ही दुर्घटना आयुष्यभरासाठी एक निशाण सोडून गेली आहे.” अशा आशयाचा मजकूर या पत्रामध्ये लिहिला आहे.

अवश्य पाहा – रितेशने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य; व्हिडीओ होतोय व्हायरल

 

View this post on Instagram

 

As Alessia cara song says “Scars to Your beautiful “

A post shared by Sana Makbul (@divasana) on

सना मकबूलने केलेली ही इन्स्टा पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनेकांना ही पोस्ट वाचून आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी तिच्यासाठी दु:ख व्यक्त केलं आहे.

सना एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने २०१२मध्ये अर्जुन या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘इस प्यार को क्या नाम दूँ’, ‘आदत से मजबूर’, ‘विश’ या मालिकांमध्ये काम केले. शिवाय तिने ‘रंगून’ आणि ‘मामा ओ चंदामामा’ या दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 3:20 pm

Web Title: dog attack on sana maqbool face mppg 94
Next Stories
1 ‘गेंदा फूल’वर जॅकलिनचा भन्नाट डान्स; पाहा ‘हा’ व्हिडीओ
2 “आधी त्या पैशांचा हिशोब द्या”; आयनॉक्सला दिग्दर्शकाने विचारला जाब
3 ‘तुझ्या नावाने ओळखल्याचा अभिमान वाटतो’; विकी कौशलच्या वडिलांनी पोस्ट केला फोटो
Just Now!
X