डोक्याला शॉट

अनेकदा चित्रपटांच्या नावावरूनच त्याच्या आशयाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जातो. असाच प्रयत्न ‘डोक्याला शॉट’ या मराठी चित्रपटाबाबतही होऊ शकतो. त्यामुळे तसे होण्याआधीच शब्दश: नावाला न जागलेला असा हा एक निखळ मनोरंजक चित्रपट आहे, हे सांगायला हवे. इथे नायक डोक्याला शॉट देतो, पण त्याच्या मित्रांच्या! वास्तवात घडलेल्या अगदी साध्यासुध्या प्रसंगावर बेतलेला हा चित्रपट प्रेक्षकांना मात्र अफलातून मनोरंजनाचा शॉट देतो.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!

चंदू (ओमकार गोवर्धन), अभी (सुव्रत जोशी), भज्जी (रोहित हळदीकर) आणि गण्या (गणेश पंडित) या चार मित्रांची ही धम्माल गोष्ट आहे. अभीचं सुब्बु (प्राजक्ता माळी) नामक दाक्षिणात्य मुलीवर प्रेम जडलं आहे. सुब्बुच्या वडिलांचा लग्नाला विरोध आहे. अखेर त्यांना लग्नाला परवानगी देण्यास तयार करण्यात अभी आणि सुब्बुला यश येते. आणि मग ऐन लग्नाच्या आधी क्रिकेट खेळताना अभी डोक्यावर पडतो. तो लग्नाच्या आधीचे सगळे विसरतो. अभीचा विचित्र अपघात, त्याचे विसरणे आणि तोंडावर आलेले लग्न या सगळ्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा अभीलाच हाताशी धरून चंदू, भज्जी आणि गण्या जे काही करतात तो सगळा प्रकार म्हणजे हा ‘डोक्याला शॉट’ नावाचा चित्रपट आहे.

शिवकुमार पार्थसारथी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून स्वतंत्रपणे पहिलाच चित्रपट आहे. आजवर त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले असल्याने स्वतंत्र दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न असला तरी त्यात कुठेही नवखेपणा जाणवत नाही. किंबहुना, कुठलीही ठोकळेबाज मांडणी नसलेला त्यांचा दृष्टिकोन दिग्दर्शनात वेगळेपणा देऊन गेला आहे. पण खरी गंमत चित्रपटाच्या पटकथेतच आहे. चित्रपट पाहताना पटकथा आणि संवादाच्या पातळीवरच तो किती भक्कम आहे हे लक्षात येते. या चित्रपटाचे पटकथा लेखन, संवाद दिग्दर्शक वरुण नार्वेकर आणि खुद्द दिग्दर्शक शिवकुमार यांनी केले आहे. तरुणाईच्या तोंडी असणारी भाषा, संवाद यांचाच वापर केल्याने साहजिकच त्यात ताजेपणा आहे. मात्र त्याचबरोबर उगाच ओढूनताणून विनोद निर्मितीसाठी द्व्यर्थी संवाद किंवा अंगविक्षेप असे कुठलेही प्रयत्न दिग्दर्शक आणि लेखकाने केलेले नाहीत. त्यामुळे अगदी कोणाच्याही घरी घडू शकेल, असा प्रसंग आणि त्या प्रसंगात सर्वसामान्यपणे कोण कसे वागू शकेल, त्याच सहजतेने ही कथा पुढे जाते. तरीही चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना पकडून ठेवण्यात यशस्वी ठरतो, हे या चित्रपटाचे वैशिष्ठय़ आहे.

कथा-पटकथा, दिग्दर्शनात प्रभावी ठरलेल्या या चित्रपटाला त्यातील मुख्य चार कलाकारांनीही तितक्याच प्रभावीपणे आणि सहजतेने उचलून धरले आहे. सुव्रत जोशी अभीच्या भूमिकेत अगदी चपखल बसला आहे. गणेश पंडित हा या टीममधला नवा खेळाडू असला तरी तो भाव खाऊन गेला आहे. ओमकार गोवर्धन आणि रोहित हळदीकर या दोघांचाही वावर तितकाच सहज, मोकळाढाकळा आहे. मुळात हे चौघेही तुलनेने चित्रपट माध्यमात नवीन असल्याने त्यांची एकत्र जमलेली भट्टी पडद्यावर चांगलीच रंगत आणते. अगदीच चुका नाहीत असे नाही, काही अनावश्यक प्रसंगही आहेत, पण त्याने रसभंग होत नाही. खूप दिवसांनी उत्तम बांधीव पटकथा आणि निखळ विनोदी आशय, संवाद असलेला मनोरंजनाचा शॉट प्रेक्षकांच्या खासकरून मराठी प्रेक्षकांच्या वाटय़ाला आला आहे. त्यामुळे ‘अशा नावाचा चित्रपट पाहणार.. डोक्यावर पडला आहेस का?’, असे कोणी विचारले तरी ‘डोक्याला शॉट’ चुकवू नका!

* दिग्दर्शक- शिवकुमार पार्थसारथी

* कलाकार- सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित, प्राजक्ता माळी.