News Flash

डोनाल्ड ट्रम्प ‘त्या’ भारतीय सौंदर्यवतीच्या हॉलिवूड पदार्पणासाठी मदत करणार?

काही दिवसांपूर्वीच अमोरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे

छाया सौजन्य- मिस मालिनी

आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारे नाव म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली. तेव्हापासूनच आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांच्या विषयीच्या विविध चर्चांना उधाण आले. सध्या त्यांच्या नावाची चर्चा रंगत आहे ते म्हणजे एका भारतीय मॉडेलमुळे. शलाभ कुमार आणि त्यांची मुलगी मनस्वी यांची नावेसुद्धा ट्रम्प यांच्यासमवेत चर्चेत आली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी मनस्वीला म्हणजेच ‘मिस इंडिया’ चा किताब पटकावलेल्या या सौंदर्यवतीला हॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पणासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे वृत्त मिस मालिनी या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले होते.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झालेल्या मुलाखतीचा खुलासा करताना मनस्वी म्हणाली की, ‘ते फारच विनोदी स्वभावाचे आहेत. आमच्यामध्ये आता एक प्रकारचे कौटुंबिक वातावरण तयार झाले आहे. आम्ही त्यांना भेटलो तेव्हा तेथे (त्यांची मुले) इवांका, डॉन आणि एरिकही होते. आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. त्यात काही खासगी गोष्टी आणि भारतातील घडामोडींवरही चर्चा झाली’. मनस्वीप्रमाणेच तिच्या वडिलांनीही ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, ‘ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार मनस्वी ही आतापर्यंत ट्रम्प यांनी पाहिलेली सर्वात सुंदर भारतीय मुलगी आहे. त्यांनी मनस्वीची प्रशंसा करत तिला बॉलिवूडमध्ये चांगल्या भूमिका मिळतील असे म्हटले. पण, मनस्वीचा हॉलिवूडकडील ओघ पाहून तिला हॉलिवूड पदार्पणात मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे’.

मनस्वी ही एक भारतीय अभिनेत्री आणि सुपरमॉडेल आहे. तिने बराच काळ अमेरिकेत व्यतीत केल्यामुळे तिचा जास्त ओघ हॉलिवूडकडेच आहे. मनस्वीचे वडिल शलाभ कुमार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारत आणि अमेरिकेमधले राजकिय संबध सुधारण्यात शलाभ हे महत्वाचा दुवा मानले जातात. डोनाल्ड ट्रम्प आणि शलाभ कुमार यांच्याच फार चांगले नाते असून त्यांच्या या नात्याची आता मनस्वीच्या हॉलिवूड पदार्पणासाठी काही मदत होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 5:57 pm

Web Title: donald trump is going to help former miss india break into hollywood
Next Stories
1 सैफचा हा ‘क्यूट’ व्हॉट्स अॅप डिपी पाहिलात का?
2 बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने १२ वाजता सलमानला दिल्या होत्या शुभेच्छा
3 नोटाबंदीच्या निर्णयाचा ‘दंगल’वर खरंच परिणाम नाही?
Just Now!
X