29 May 2020

News Flash

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ची स्तुती; म्हणाले…

जेव्हा डोनाल्ड ट्रम्प म्हणतात ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ला ग्रेट, कारण....

अभिनेता आयुषमान खुराना बॉलिवूडमधील अत्यंत प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो आपल्या प्रत्येक नव्या चित्रपटात आव्हानात्मक भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो. सध्या त्याचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट जोरदार चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात पुरुषांची समलिंगी लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. या अनोख्या लव्हस्टोरीचे कौतुक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील केले आहे.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

अमेरिकी मानवाधिकार संरक्षक कार्यकर्ता पीटर टचल यांनी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाच्या संकल्पनेची स्तुती केली. “भारतात समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळाली. आता देशातील वैचारिकदृष्ट्या मागस लोकांचं प्रबोधन करण्यासाठी बॉलिवूडचा एक नवा चित्रपट सज्ज झाला आहे. या चित्रपटात समलिंगी लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.” अशा आशयाचं ट्विट पीटर टचल यांनी केलं होतं. हे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ग्रेट’ असं म्हणत रिट्विट केलं आहे.

ट्रम्प यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान अनेकांनी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाची तोंड भरुन स्तुती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 11:46 am

Web Title: donald trump shubh mangal zyada saavdhan ayushmann khurrana mppg 94
Next Stories
1 मिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या
2 शत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल
3 उपहासातून वास्तवाकडे..
Just Now!
X