News Flash

सुपर व्हिलन थेनॉसमुळे डोनाल्ड ट्रम्प झाले ट्रोल

अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.

अमेरिकेत सध्या निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. ही निवडणुक पुढच्या वर्षी होणार आहे. मात्र, हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचारास आत्तापासूनच सुरुवात केली आहे. अलिकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमने एक व्हिडीओ ट्विट केला होता. मात्र, विरोधकांना आव्हान देण्यासाठी केलेले ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलेच भारी पडले आहे. त्यांना या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

‘हा’ आहे बॉलिवूडमधील नवा सुपरस्टार, एका वर्षात केली तब्बल ४७५ कोटी रुपयांची कमाई

काय आहे या ट्विटमध्ये?

या ट्विटमध्ये सात सेकंदांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ‘थेनॉस’च्या अवतारात दिसत आहेत. ‘थेनॉस’ हा एक काल्पनिक खलनायक आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनीटी वॉर’ या सुपरहिरो चित्रपटामध्ये तो मुख्य खलनायक होता. ज्या प्रमाणे थेनॉसने ‘इन्फिनीटी स्टोन’च्या मदतीने केवळ टिचकी वाजवून सर्व सुपरहिरोंचा खात्मा केला. अगदी त्याच प्रमाणे ट्रम्पआपल्या विरोधकांना चुटकी सरशी हरवतील असे या व्हिडीओत दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओत विरोधकांवर शाब्दिक वार करण्यासाठी ट्रम्प यांच्या टीमने कुप्रसिद्ध खलनायक ‘थेनॉस’चा वापर केला त्यामुळे त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

Video : एकटक पाहणाऱ्या कार्तिक आर्यनमुळे तरुणी वैतागली, अन्..

काय म्हणाले नेटकरी?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 12:38 pm

Web Title: donald trump thanos united states presidential election 2020 mppg 94
Next Stories
1 … म्हणून नागार्जुनने लक्ष्मीसोबत लग्न केले
2 पहिल्याच भेटीत राज कपूर यांच्यावर का चिडल्या होत्या साधना?
3 जाणून घ्या राज कपूर- नर्गिसच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा
Just Now!
X