‘सत्यमेव जयते’च्या पहिल्या पर्वाच्या वेळी टीआरपीवरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आयपीएल सामने आणि आमिरच्या या शोचा टीआरपी यावरून एवढा वादंग निर्माण झाला होता की त्यामुळे टीआरपीची विश्वासार्हताच धोक्यात आली. ‘सत्यमेव जयते’च्या नव्या पर्वाविषयी बोलताना तर आमिरने टीआरपी-टीव्हीटीवर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले आहे.  काही हजार घरांमध्ये लावलेल्या डब्यांवरून एखादा शो किती घरातून पाहिला जातो याचे केले जाणारे विश्लेषण अत्यंत फसवे आहे. त्यापेक्षा १५ टक्के जनतेने इंटरनेटवरून दिलेला कौल जास्त परिणामकारक असतो.