फॅशनचं दुसर नाव म्हणजे कंगना रणावत. आपल्याला आवडेल ती स्टाईल आत्मविश्वासान कॅरी करणे हे कंगनाचे वैशिष्ट्य आहे. हट के पॅटर्न, हेअरस्टाइल त्यावर फंकी मेकअप करणे, हे कंगनाची स्टाईल स्टेटमेण्ट आहे. हे पाहाता तिला ‘इंडियन लेडी गागा’ अशी उपमा दिली असता, तिने चक्क त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
लेडी गागा आणि माझ्यात तुलनाच होऊ शकत नाही, असे तिचे स्पष्ट मत आहे. फॅशनमध्ये अँटिक स्टाइल कॅरी करणारी आंतरराष्ट्रीय पॉपस्टार लेडी गागा माध्यमांमध्ये नेहमीच चर्चेत असते. आपली कंगनाही अशीच. मात्र, फॅशनच्या मुद्द्यावरून लेडी गागा आणि माझ्यात अजिबात तुलना करू नका असे ती म्हणाली. मी अभिनेत्री आहे आणि ती पॉप स्टार. फॅशनच्या बाबतीत सांगायचं, आजकाल प्रत्येक स्त्री स्टायलिंगबाबत जागरूक आहे. लेडी गागा तिच्या लूकवर नेहमी प्रयोग करत असते. प्रत्येकानेच ते करायला हवेत; कारण लूक्स आणि पेहराव समोरच्या व्यक्तीवर आपली छाप पाडत असते,’ असे कंगनाचे मत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 2:22 am