News Flash

आगीत तेल ओतायला लावू नका- कल्की कोचलीन

पाकिस्तानी कलाकारांवर घालण्यात आलेल्या बंदीवर तिने मत मांडले

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या वादावर तिने आतापर्यंत काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. ‘हे प्रकरण काही दिवसांपासून चांगलेच गाजते आहे. त्यामुळे मला यात आगीमध्ये तेल ओतायचे नाही. मला स्वतःला असे वाटते की आपण एका आंतराष्ट्रीय जगात जगत आहोत आणि भारतीय हे सर्वत्र पसरलेले आहेत. अनिवासी भारतीयांना जर आपण भारतात परत बोलावले तर त्यांना राहायला जागा कुठे देणार,’ असे कल्की यावेळी म्हणाली.
‘तसेच, जर परदेशातील लोक आपल्या देशात राहत असतील, अगदी त्यात मीसुद्धा येते. मी मूळची फ्रेन्च आहे पण माझा जन्म आणि पालनपोषण भारतात झाले आहे. पण मग जर मी या देशातली नाही तर मग माझे अस्तित्व काय आहे? त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेणे फार जरुरी आहे,’ असे ती म्हणाली.
उरी हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध विकोपाला गेले आहेत. सद्य स्थिती पाहता पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली. पाकिस्तानी कलाकारांना अशी बंदी घातल्यामुळे बॉलिवूडमध्ये दोन गट पडले. एक गट या बंदीचे स्वागत करताना दिसला तर काहींनी याचा कडाडून विरोधही केला.
दरम्यान, अभिनेत्री कल्की ब्युटिफुलहोम्स डॉट कॉम या होम डेकॉरच्या ऑनलाइन मासिकाशीही निगडीत आहे. तिला सुझान खानचं घर फार आवडतं असं ती म्हणाली. तुला सेलिब्रिटींपैकी कोणाचं घर आवडतं असा प्रश्न विचारला असता तिने, सुझान खानचं नाव घेतलं. यावर ती म्हणाली की, ‘सुझान खानची निवड खूपच चांगली आहे. तिच्या नजरेतच गोष्टी चांगल्या सजवण्याचे गुण असावेत. गार्डनच्या सजावटीमध्येही तिचे छोट्या छोट्या गोष्टींकडे इतके लक्ष असते की आपण कधी त्याचा विचारही करत नाही. मला तिची आवड निवड फार आवडते.
ब्युटिफुलहोम्स डॉट कॉम या ऑनलाइन मासिकाचे बुधवारी कल्की कोचलिनच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 3:37 pm

Web Title: dont want to add fuel to fire says kalki koechlin on pakistani actors
Next Stories
1 .. या छायाचित्रातील आघाडीच्या अभिनेत्याला ओळखलंत का?
2 आयुष्यातील चढ-उताराचा वेध घेणारा ‘वलय’
3 Bigg Boss 10: ‘बिग बॉस’च्या घरात चोरी करताना दिसले स्वामीजी
Just Now!
X