03 March 2021

News Flash

ही बालकलाकार साकारणार छोट्या रमाबाईंची भूमिका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत सुरु झालंय नवं पर्व

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा मग ते रामजी बाबा असोत, भीवा असो आत्या, तुळसा वा मीरा प्रत्येकानेच आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतलं हे कुटुंब प्रत्येकालाच आपलंस वाटतंय. या कुटुंबात लवकरच नव्या सदस्याची भर पडणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत लवकरच छोट्या रमाची एण्ट्री होणार आहे.

मृण्मयी सुपल बालपणीच्या रमाची भूमिका साकारणार आहे. मृण्मयीला याआधी बऱ्याच मालिका आणि सिनेमांमधून आपण भेटलोय. रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारणं तिच्यासाठी नवं आव्हान असणार आहे. रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, आंदोलनं असो वा सत्याग्रह रमाबाई त्यांच्यापाठीशी सावली प्रमाणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी कुटुंबही सांभाळलं.

मृण्मयी सुपल

महापुरुषाची सहचारिणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने पाळलं. रमाबाईंचं बालपण साकारायला मिळण्याची संधी मृण्मयीला मिळाली आहे. मृण्मयी या भूमिकेसाठी सध्या खूप मेहनत घेतेय. मालिकेतली बोलीभाषा आणि तेव्हाचा काळ उभा करण्यात मृण्मयीला मालिकेची संपूर्ण टीम मदत करतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 6:22 pm

Web Title: dr babasaheb ambedkar serial this child actress will portray ramabai ssv 92
Next Stories
1 सेक्स सीन अभिनेत्रीच्या नावेच लीक का होतो? राधिका आपटे
2 Video: माधव देवचकेला बिग बॉस जिंकण्यासाठी राखी सावंतने दिल्या शुभेच्छा
3 Bigg Boss Marathi 2: ‘आता सगळ्यांचा हिशोब होणार’; पराग कान्हेरे परतणार?
Just Now!
X