News Flash

लवकरच ‘फुलराणी’ साकारणार शतक

हे नाटक सध्या महाराष्ट्रात हाऊसफुल्ल सुरू आहे

हेमांगी कवी

प्रत्येक पिढीतल्या निर्मात्या दिग्दर्शकाला भुरळ घालणाऱ्या ‘ती फुलराणी’ या अजरामर कलाकृतीला आजवर उदंड प्रेक्षकवर्ग लाभला. अशावेळी ‘ती फुलराणी’ हे नाटक नव्या रुपात आणि नव्या संचात घेऊन येण्याचं शिवधनुष्य लेखक, नाट्यदिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी उचललं आणि अवघ्या काही दिवसांतच या नाटकाने शंभराव्या प्रयोगाकडे यशस्वी वाटचाल केली. हे नाटक सध्या महाराष्ट्रात हाऊसफुल्ल सुरू आहे. प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे या नाटकाने आतापर्यंत ९९ यशस्वी प्रयोग पार पाडले आणि लवकरच १०० वा प्रयोग मुंबई येथील दीनानाथ नाट्यगृहात साजरा होणार आहे. या नाटकाच्या यशात निर्माते लीना जुवेकर- दत्तगुप्ता व राहुल जुवेकर यांचा ही मोलाचा वाटा आहे.

येत्या रविवारी २१ तारखेला दुपारी ३.४५ वाजता दीनानाथ नाट्यगृहात ‘ती फुलराणी’ च्या शंभराव्या प्रयोगाचा आनंद उत्सव रंगणार आहे. या शंभराव्या प्रयोगासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले आहे. नाटकाच्या संपूर्ण टीमचा मानचिन्ह देऊन यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. रसिकांना पुर्नप्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ‘ती फुलराणी’ च्या संपूर्ण टीमचं सध्या नाट्यरसिकांकडून कौतुक होतयं. अशावेळी या नाटकाचा इतक्या कमी अवधीत होणारा हा शतक महोत्सवी प्रयोग खरोखरच अभिनंदनीय आहे. अचाट, अफाटपूर्ण उर्जा असलेल्या या फुलराणी’ चा दरवळ उत्तरोत्तर अशाच बहरेल हे निश्चित.

अॅडोनिस मल्टीमिडिया अॅण्ड एण्टरटेन्मेंट प्रा.लि’ निर्मित ‘ती फुलराणी’ या नाटकात फुलराणीच्या भूमिकेतील हेमांगी कवी आणि प्राध्यापकांच्या भूमिकेत डॉ. गिरीश ओक आहेत. सोबत विजय पटवर्धन, सुनील जाधव, दिशा दानडे, अंजली मायदेव, मीनाक्षी जोशी, रसिका धामणकर, नितीन नारकर, प्रांजल दामले, निरंजन जावीर, हरीश तांदळे हे कलाकार आहेत. सूत्रधार नितीन नाईक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 4:57 pm

Web Title: dr girish oak and hemangi kavi starrer marathi natak ti phularani soon complete its 100 th play
Next Stories
1 ‘देवसेना’ आता बॉलिवूडमध्येही झळकणार?
2 …यांच्यामुळे बॉलिवूडला मिळाली अनुष्का शर्मा
3 या अभिनेत्याचे ट्विटर अकाऊंट झाले हॅक
Just Now!
X