News Flash

Video: ‘शादी के साइड इफेक्ट्स’, संकेत भोसलेने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

सध्या त्याचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘द कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्री सुगंधा मिश्राने काही दिवसांपूर्वीच डॉ. संकेत भोसलेशी लग्न केले. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांनी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता संकेतने शेअर केलेला मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

संकेतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी सुगंधा सोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संकेत आणि सुगंधा टेबलवर बसून जेवताना दिसत आहेत. तितक्यात संकेतची आई तेथे येते आणि सुगंधाला म्हणते, ‘मी तूझे ताट उचलून ठेवते.’ सुगंधा त्यांना ‘नको मी ठेवते’ असे बोलताना दिसत आहे. दरम्यान संकेत आईला विनंती करतो की माझे ताट किचनमध्ये ठेव. पण आई नकार देते आणि तुझे ताट तू ठेव असे बोलताना दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@drrrsanket)

सध्या संकेतचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘शादी के साइड इफेक्ट्स’ असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@drrrsanket)

तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये संकेत पत्नीच्या पायाजवळ बसला असून बोलताना दिसत आहे की लग्नानंतर काही बदलत नाही. ‘सगळ्यांना असे का वाटते की लग्नानंतर पती पत्नीचा गुलाम होतो. पण असे काहीच नाही. प्रेम नावाची गोष्ट पण असते की नाही?’ असे संकेत बोलताना दिसतो. त्याचे हे दोन्ही मजेशीर व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 3:29 pm

Web Title: dr sanket bhosale shares funny video of shadi ke side effects avb 95
Next Stories
1 “मोदीजी तुम्हाला लाज वाटत नाही का?”, ‘त्या’ व्हिडीओ नंतर पायल रोहतगी ट्रोल
2 ‘फुकरे’ फेम मनजोत सिंहने करोनाग्रस्त भावासाठी मागितली मदत; आधी केलं ट्विट नंतर केलं डिलीट ?
3 लग्नाच्या वाढदिवशी करोना पॉझिटिव्ह, सुव्रत म्हणतो ‘अनोखी भेट’
Just Now!
X