News Flash

“मुलगी ‘मराठी’ शिकली प्रगती झाली”,संकेतने केला सुगंधाचा फोटो शेअर

संकेत आणि सुगंधाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय विनोदी शो म्हणजे ‘द कपिल शर्मा’ आहे. या शोमधून घराघरात पोहचलेली कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि विनोदवीर डॉ.संकेत भोसले लग्न बंधनात अडकले आहेत. २७ एप्रिल रोजी जालंधरमध्ये त्यांचा लग्न सोहळा पार पडला. संकेतने त्याच्या लग्नाच्या सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यातील नुकताच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे त्याने दिलेल्या कॅप्शनने वेधले आहे.

संकेतने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत संकेतने कुर्ता परिधान केला आहे. तर सुगंधाने नारंगी रंगाची साडी नेसली आहे. ते दोघेही फोटोमध्ये हात जोडून उभे असून सगळ्यांनी दिलेल्या आशिर्वादाचे आणि शुभेच्छांचे आभार मानत आहेत. तर सगळ्यांचे लक्ष हे संकेतने दिलेल्या कॅप्शनने वेधले आहे. मुलगी ‘मराठी’ प्रगती झाली, आम्हाला आशिर्वाद आणि शुभेच्छा दिलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार, असे कॅप्शन संकेतने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by(@drrrsanket)

 

View this post on Instagram

 

A post shared by(@drrrsanket)

 

View this post on Instagram

 

A post shared by (@drrrsanket)

गेल्या चार वर्षांपासून सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले रिलिशनशिपमध्ये होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २६ एप्रिल रोजी या दोघांनी लग्न केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 7:06 pm

Web Title: dr sanket bhosle shared a photo with wife sugandha mishra and said mulgi marathi shikli pragati jhali dcp 98
Next Stories
1 ‘मी सध्या सिंगल आहे…’, पार्थ समथानचा खुलासा
2 “पंतप्रधानांकडे लक्झरी घर असायलाच हवं”; केआरकेचा मोदींना खोचक टोला
3 ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’च्या टायटल ट्रॅकचे अनावरण!
Just Now!
X