नाटकावरून निर्माण होणारा मराठी चित्रपट यशस्वी ठरतो का नाही? ते ‘माध्यमांतर’ कितपत जमते कसे जमते ते करावे की नाही अशा गोष्टींची सतत चर्चा होत असते. तरी, तसे दोन नाटकावरील चित्रपट मात्र प्रदर्शनासाठी सज्ज आहेत…
‘नवा गडी नवे राज्य’ या नाटकावरूनच ‘टाईम प्लीज… गोष्ट लग्नानंतरची’ या चित्रपटात नाटकातीलच उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी आहे. विषेश म्हणजे या नाटकाचे प्रयोग सुरू असतांनाच या दोघांचे लग्न झाले आणि संसाराचा अनुभव चित्रपटासाठी उपयोगी पडला.
‘श्रीमंत दामोदर पंत’ म्हटल्यावर नाटक आठवते, त्यामुळे तेच नाव चित्रपटासाठी कॅश करण्याचा प्रयत्न होत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे याने मूळ नाटकातील भरत जाधव आणि वाजय चव्हाण हे दोनच कलाकार चित्रपटात कायम ठेवले.
हे चित्रपट यशस्वी ठरल्यास नाटकावरून चित्रपट हा प्रकार वेग घेईल का?