News Flash

ड्रग्ज प्रकरण : अभिनेता अर्जुन रामपालसह गर्लफ्रेंडचीही होणार चौकशी; NCBने बजावलं समन्स

यापूर्वी अर्जुनच्या मेहुण्याचेही नाव समोर आले होते..

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी तापास सुरु असताना ड्रग्ज प्रकरण समोर आले होते. त्यानंतर अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) तापस सुरु केला होता. त्यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली. नुकतात एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालच्या घराच्या परिसरात धाड टाकली होती. आता चौकशीसाठी अर्जुनसह गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सला समन्स बजावलं आहे.

एएनआयने ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सला एनसीबीने समन्स बजावलं आहे. ११ नोव्हेंबर रोजी तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आज सकाळी अर्जुन रामपालच्या घराच्या परिसरात एनसीबीने धाड टाकली होती. त्यालासुद्धा ११ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

याआधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतलं. ड्रग्जप्रकरणी त्याचं नाव समोर आल्याने अ‍अँगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितलं. स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 4:56 pm

Web Title: drugs case bollywood actor arjun rampal girlfriend gabriella summons by ncb on nov 11 avb 95
Next Stories
1 कर्जतचा वडापाव खाण्यासाठी शिल्पा शेट्टीने थांबवली गाडी; पाहा व्हिडीओ
2 “अर्णबला भारतात भीती वाटत असेल तर त्याने पाकिस्तानमध्ये जावे”, अभिनेत्याचे ट्विट चर्चेत
3 ‘कॉमेडी बिमेडी’च्या पहिल्या भागाची खास झलक
Just Now!
X