News Flash

शाहरुखला भेटायला आलेली दुआ लीपा अडकली वाहतूक कोंडीत

आंतरराष्ट्रीय गायक दुआ लीपा 'वन प्लस म्यूझिक फेस्टिव्हल'मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आली आहे.

आंतरराष्ट्रीय गायक दुआ लीपा ‘वन प्लस म्यूझिक फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आली आहे. तिने पॉपस्टार केटी पेरीसह परफॉर्मन्स करण्यापूर्वी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची भेट घेतली. दुआ लीपा शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली. त्यावेळी तिला मुंबईतील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन याबाबत माहिती दिली. या फोटोमध्ये ती कारच्या खिडकीबाहेर जाऊन मजा करताना दिसत आहे. वाहतूक कोंडीतून सुटल्यानंतर तिने शाहरुखची भेट घेतली व त्याच्याबरोबर काढलेला एक फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

शाहरुखने देखील तिच्याबरोबर काढलेला फोटो ट्विट केला आहे. “दुआ लीपा ही एक सुंदर युवती आहे. तिचा आवाज खुप सुंदर आहे. तुझ्या कॉन्सर्टसाठी माझ्या शुभेच्छा आणि मी शिकवलेल्या डान्सच्या स्टेप्स स्टेजवर करायला विसरु नको” अशा शब्दात त्याने तिची स्तुती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 7:30 pm

Web Title: dua lipa shahrukh khan mppg 94
Next Stories
1 नागराज यांचा ‘झुंड’ वादाच्या भोवऱ्यात, अमिताभ यांनाही नोटीस
2 अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा पती नेमकं करतो काय?
3 अभिजीत बिचुकलेने घेतली जितेंद्र जोशीची फिरकी, पाहा व्हिडीओ
Just Now!
X