News Flash

राजघराण्यात पाळणा हलणार, मेगन होणार आई

मेगन मार्कल गर्भवती असून वसंत ऋतूत राजघराण्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची माहिती केनिंग्सटन पॅलेसनं दिली आहे.

१९ मे रोजी प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल विवाहबंधनात अडकले होते.

ब्रिटनच्या शाही राजघराण्यात लवकरच पाळणा हलणार आहे. ब्रिटनच्या राजघराण्याची नवी सून ‘डचेस ऑफ ससेक्स’ लवकरच आई होणार आहे. केनिंग्सटन पॅलेसकडून अधिकृतरित्या ही माहिती देण्यात आली आहे. १९ मे रोजी प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल विवाहबंधनात अडकले होते.
मेगन मार्कल गर्भवती असून वसंत ऋतूत राजघराण्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची माहिती केनिंग्सटन पॅलेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.

अशी सुरू झाली मेगन आणि प्रिन्स हॅरीची प्रेमकहाणी
मेगन आणि हॅरीची प्रेमकहाणी कोणा एका परिकथेप्रमाणेच आहे असे म्हणायला हरकत नाही. २०११ मध्ये मेगनने अभिनेता ट्रेवर इंगल्सनशी लग्न केलं होतं. मात्र २०१३ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट दिला. जून २०१६ पासून ती प्रिन्स हॅरीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. एका मित्राने त्या दोघांनाही ‘ब्लाइंड डेट’वरही पाठवले होते. त्यावेळी ते दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. किंबहुना हॅरीने मेगनचे नावही कधीच ऐकले नव्हते. मेगनलाही ब्रिटनच्या शाही कुटुंबाविषयी फार माहिती नव्हती, त्यामुळे हॅरीसोबत डेटवर जाण्यापूर्वी तीसुद्धा साशंक होती. पण, त्यानंतर मात्र या दोघांची मनं जुळली आणि एका वेगळ्याच प्रवासाला सुरुवात झाली.

१९ मे २०१८ मध्ये मेगन आणि प्रिन्स हॅरी विवाहबंधनात अडकले. विवाहनंतर मेगननं अभिनयाला पूर्णपणे सोडचिठ्ठी दिली. सध्या हे शाही जोडपं ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 1:52 pm

Web Title: duchess of sussex meghan markle expecting a baby this spring
Next Stories
1 ‘हा’ व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा म्हणतात, ‘मी, गरब्याचा रोजच्या व्यायामात समावेश करेन’
2 अबब ! देवीच्या मंडपासाठी वापरली तब्बल ४ हजार किलो हळद
3 पाहा… ४ कोटींच्या नोटा आणि ४ किलो सोन्यापासून सजलेले मंदिर
Just Now!
X