News Flash

तारीख पे तारीख! ‘KGF चॅप्टर 2’चं प्रदर्शन पुन्हा रखडलं

येत्या १६ जुलै रोजी ‘केजीएफ चॅप्टर २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी माहिती दिली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे ‘केजीएफ चॅप्टर १.’ तुफान यश आणि लोकप्रियता मिळालेल्या या चित्रपटाच्या सिक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. येत्या १६ जुलै रोजी अभिनेता यशचा ‘केजीएफ चॅप्टर २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनूसार, केजीएफ चॅप्टर २ च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरु आहे. तसेच चित्रपटगृहे पुन्हा सुरु झाल्यावर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : सैफ अली खान वयाच्या ५०व्या वर्षी चौथ्यांदा बाबा झाल्यावर सारा अली खान म्हणाली..

दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या वाढदिवसाची भेट म्हणून केजीएफ चॅप्टर 2 चा टीझर प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, प्रेक्षकांचं प्रेम आणि चाहत्यांकडून होत असलेल्या मागणीमुळे चित्रपटाचा टीझर एक दिवस आधीच म्हणजे ७ जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला. टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटात अभिनेत्री रविना टंडन एका राजकीय व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘केजीएफ चॅप्टर – १’ हा चित्रपट ज्या ठिकाणी संपला, तेथूनच पुढे केजीएफ चॅप्टर 2 ची कथा सुरु होत आहे. या सिक्वलमध्ये यशसोबत संजय दत्त आणि रविना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १६ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 1:20 pm

Web Title: due to covid 19 pandemic yash kgf chapter 2 wont release on july 16 avb 95
Next Stories
1 ’फादर्स डे’च्या निमित्ताने ‘जून’ टीमकडून सर्व ‘बाबां’ना अनोखी भेट, बाबांसाठी खास गाणं
2 ‘माझा नवरा पर्फेक्ट आहे पण…’, शिल्पाने केला खुलासा
3 Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला लग्नासाठी १० दिवसांचा जामीन मंजूर
Just Now!
X