28 February 2021

News Flash

..म्हणून झरीनवर आली बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करण्याची वेळ

सलमानच्या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करुनही बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करण्याची आली वेळ

झरीन खान

चित्रपटसृष्टीची झगमगीत दुनिया अनेक तरुण-तरुणींना आपल्याकडे आकर्षित करते. अनेकदा अभिनय सोडून सौंदर्य, शरीरयष्टी या बाह्यगोष्टींना या दुनियेत अतिमहत्त्व दिले जाते. जाड असणे किंवा सावळेपणा अनेकांच्या करियरसाठी अडथळा ठरतो. अभिनेत्री झरीन खानलाही सुरूवातीच्या काळात अशाच अडचणींचा सामना करावा लागला.

वाचा : ‘रियाने माझा लैंगिक छळ केला नाही’

सलमान खानच्या ‘वीर’ चित्रपटाने झरीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, या दुनियेत अभिनेत्रींच्या निवडीसाठी शारीरिक मापदंड असल्यामुळे तिला काही मोठ्या चित्रपटांना मुकावे लागले. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत झरीन तिच्या करिअरविषयी म्हणाली की, मला कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. सलमानसोबत मला काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी ड्रीम डेब्यू होता. पण, या पहिल्या चित्रपटानंतर माझा खरा संघर्ष सुरु झाला. मी इतर अभिनेत्रींप्रमाणे दिसायला सुंदर असले तरी माझे वजन खूप आहे, असे मला म्हटले जायचे. माझे वाढलेले वजन हा जणू राष्ट्रीय प्रश्न झाला होता. काही वर्षांनंतर दुसऱ्या अभिनेत्रींनी वजन वाढवले तर त्यांची प्रशंसा करण्यात आली. मला मात्र अगदी त्याच्या उलट प्रतिक्रियांना सामोरे जावे लागत होते.

माझ्यावर तेव्हा टीकेचा भडीमार होत होता. मी कशी दिसते? कसे कपडे घालते? यामुळे माझे घरातून बाहेर पडणेही कठीण झाले होते. घरातून बाहेर पडल्यानंतर कोणी माझा फोटो काढला तर टीकेला सामोरे जावे लागेल, अशी भीती मला सतत वाटायची. त्यामुळे मी निराशेच्या गर्तेत अडकण्याची शक्यता होती. पण, माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे मला स्वतःला सांभाळणे गरजेचे होते, असेही झरीनने म्हटले.

वाचा : ‘खतरो के खिलाडी ८’ या तीन सेलिब्रिटींमध्ये होणार अंतिम टक्कर

स्थुलपणामुळे झरीनला ‘ए’ ग्रेड चित्रपटांना मुकावे लागले. ‘हेट स्टोरी ३’मुळेच आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल आल्याचेही तिने आवर्जून सांगितले. या चित्रपटाप्रमाणेच ‘अक्सर २’मध्येही झरीनचा हॉट अंदाज दिसणार आहे. याबद्दल ती म्हणाली की, चुंबनदृश्य आता चित्रपटांमध्ये सामान्य बाब झाली आहे. पण त्यातही भेदभाव केला जातो. नामांकित बॅनरच्या चित्रपटात एखाद्या मोठ्या अभिनेत्याने चुंबनदृश्य दिले तर त्याला ‘हॉट’ म्हटले जाते. पण, आमच्यासारख्या छोट्या कलाकारांनी असं केलं तर त्याला ‘इरॉटिक’ म्हणून हिणवले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 2:41 pm

Web Title: due to my heavy weight i didnt get a grade movies says zareen khan
Next Stories
1 प्रियांका चोप्राचा नोबेल विजेत्या मलालासोबत ‘फॅन मुमेन्ट’
2 मनोज वाजपेयीच्या ‘रुख’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
3 Khatron Ke Khiladi 8: ‘खतरो के खिलाडी ८’ या तीन सेलिब्रिटींमध्ये होणार अंतिम टक्कर
Just Now!
X