News Flash

इंटीमेट सीन करताना कशी होते अवस्था, अभिनेत्यानंच केला खुलासा

नेहा धूपियाच्या शोमध्ये अभिनेत्याने हा खुलासा केला आहे

रुपेरी पडद्यावर इंटीमेट सीन देणे ही सोपी गोष्टी नाही. हा सीन देण्यासाठी कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आजकाल असे सीन्स केवळ चित्रपटांपूरता मर्यादित न राहता मालिका किंवा वेब सीरिजमध्ये देखील पाहायला मिळतात. नुकताच अभिनेता दुलकर सलमानने इंटीमेट सीन देतानाचा अनुभव सांगितला आहे.

दुलकर सलमनने नेहा धूपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ शोमध्ये हजेरी लावली होती. त्याने शोमध्ये नेहासोबत गप्पा मारल्या आणि त्याच्या आयुष्यातील काही मजेशीर गोष्टी सांगितल्या. दरम्यान त्याने चित्रपटामध्ये इंटीमेट सीन शूट करताना दडपण येत असल्याचे सांगितले. तसेच शूट करताना त्याचे हात पाय थरथरत असल्याचा खुलासा देखील केला.

आणखी वाचा : इंटिमेट सीन देण्यासाठी मला मुलीनेच प्रोत्साहन दिलं

‘मी नेहमी याचा विचार करतो की माझी कोस्टार काय विचार करत असेल की, मी यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे? महिलांना अशा गोष्टी लगेच कळतात. नंतर मला वाटतं की मी न्यूड आहे’ असे दुलकर म्हणाला.

दुलकर सलमानने काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘द जोया फॅक्टर’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 6:29 pm

Web Title: dulquer salmaan talks about giving intimate scenes in movie avb 95
Next Stories
1 नेटकऱ्यांना ‘याड’ लावणारं गाणं, इंटरनेटवर झालंय सर्वाधिक सर्च
2 ‘शमशेरा’ चित्रपटात दिसणार मराठमोळी अभिनेत्री
3 ‘अर्जुन रेड्डी’मधील अभिनेत्रीची बॉलिवूडमध्ये एंट्री
Just Now!
X