बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी लवकर एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘दुर्गामती द मिथ’ असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून काही प्रेक्षक संतापले आहेत. हा चित्रपट तर ‘भागमती’ या तेलुगु चित्रपटाचा रिमेक असल्याची टीका करत आहेत. या टीकेवर आता अर्शदने प्रतिक्रिया दिली. जर कथानक चांगलं असेल तर रिमेक करण्यात काहीच वाईट नाही, असं प्रत्युत्तर त्याने टीकाकारांना दिलं आहे.

अवश्य पाहा – “याला म्हणतात आत्मसन्मान”; ते दृश्य पाहून प्रकाश राज यांनी केलं शेतकऱ्यांचं कौतुक

बॉलिवूडवर अनेकदा नक्कल केल्याचा आरोप केला जातो. बॉलिवूडमधील अनेक चित्रपट आणि गाणी इतर भाषांत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची कॉपी असते अशी वारंवार केली जाते. या टीकेवर अर्शदने भाष्य केलं. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “दाक्षिणात्य आणि पाश्चत्य चित्रपट खूप चांगले असतात हे आपण मान्यचं करायला हवं. ते आपल्या चित्रपटांमध्ये जे प्रयोग करतात तसे प्रयोग बॉलिवूडमध्ये खूप कमी प्रमाणावर केले जातात. कारण आपल्याला ट्राय अँड टेस्ट फॉर्म्युला आवडतो. पण या वादाची एक दुसरी बाजू देखील आहे. अनेक चित्रपट भाषेच्या मर्यादेमुळे प्रेक्षकांना कळत नाहीत. त्यांचा आशय खूप छान असतो. काही वेळा ते डबिंग देखील करतात. परंतु तो भाव चित्रपटात दिसत नाही. असे चित्रपट रिमेक करायला काहीच हरकत नाही. कारण त्या कथानकाला बॉलिवूड निर्माते आणखी चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करतात.”

अवश्य पाहा – VIDEO: रिअल लाईफ सुपरहिरो; अभिनेत्याने डोळ्यांवर ओतलं वितळतं मेण

अवश्य पाहा – ‘माझ्या यशाच्या आड येऊ नकोस, अन्यथा…’; एक्स बॉयफ्रेंडला पवित्राचा इशारा

दुर्गामती या चित्रपटात अर्शद वारसीसोबत भूमी पेडणेकर, माही गिल, करण कपाडिया आणि जिशू सेनगुप्ता यांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘भागमती’चे दिग्दर्शक जी अशोक हेच ‘दुर्गामती’चं दिग्दर्शन करत असून भूषण कुमार, अक्षय कुमार आणि विक्रम मल्होत्रा हे निर्माते आहेत. येत्या ११ डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट प्रदर्शित होईल.