सध्या बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल म्हणजे सारा अली खान आणि कार्तिक आर्यन. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीपेक्षा ऑफस्क्रीन केमिस्ट्रीच्या जोरदार चर्चा सुरु असतात. लवकरच त्या दोघांचा ‘लव्ह आजकल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्यांच्या या चित्रपटापेक्षा प्रमोशनदरम्यानचा व्हायरल झालेल्या व्हिडीओची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. व्हिडीओमध्ये सारा कार्तिकवर भडकल्याचे दिसत आहे.

सारा आणि कार्तिक त्यांचा आगामी चित्रपट लव्ह आजकलचे प्रमोशन करण्यासाठी एका युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये पोहोचले होते. दरम्यान तेथे त्यांच्यात वादा झाल्याचे समोर आले. त्यांच्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कार्तिक एका बसवर बसला आहे. तसेच तो सारालादेखील बसवर चढण्यास सांगतो. पण साराचा पारा चढतो आणि ती कार्तिकला तुला हवं ते कर असे म्हणून तेथून निघून जाते. पिंकव्हिलाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी एका डान्स शो दरम्यान कार्तिकच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे सारा काळजीपोटी असे करण्यास नकार देत होती. पण कार्तिकने तिचे काहीच ऐकले नाही. २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाचा हा प्रिक्वल आहे. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या त्या चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. आता ‘लव्ह आज कल’च्या रिमेकमध्ये सैफची लेक सारा अली खान झळकणार असल्याने चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.