अभिनेता रणवीर सिंग हा नेहमीच काहीतरी वेगळ करून चाहत्यांना अनेपेक्षित धक्का देत असतो. त्याचा अतिउत्साह, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणं, खोडकर स्वभाव अनेकांना भावतो. रणवीरचा हाच बिंधास्तपणा त्याला नेहमीच इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. एखादी गोष्ट मनात आली की लोक काय म्हणतील याचा विचार करण्याऱ्यांपैकी रणवीर नाही. तर अशा या रणवीरला जेव्हा तो आलेल्या हॉटेलमध्ये लग्न सुरु असल्याचं समजलं त्यावेळी विचार न करता तो धडक लग्नमंडपात पोहोचला. त्याला पाहून वधू-वरासह सगळेच गडबडले, चक्क रणवीर लग्नात आलेला पाहून सगळ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.

https://www.instagram.com/p/BrfRx4shFdp/

‘सिम्बा’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणवीर मुंबईतील एका हॉटेलमध्ये आला होता. यावेळी त्याच हॉटेलमध्ये विवाहसोहळा सुरू असल्याचं रणवीरला कळलं. मग काय क्षणाचा विलंब न करता वधू वराला शुभेच्छा देण्यासाठी रणवीर लग्नमंडपात पोहोचला. त्याला पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सेल्फी घेण्यासाठी अक्षरश: रणवीर भोवती गर्दी जमली.  रणवीरनं यावेळी वधूची नजर काढत वधू-वराला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या.