24 January 2019

News Flash

Dus Ka Dum: तब्बल आठ वर्षांनी सलमान दाखवणार ‘दस का दम’

सलमानच्या प्रश्नांसाठी व्हा सज्ज

सलमान खान

‘बिग बॉस ११’नंतर सलमान खान टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांपासून दूर जाणार असा अनेकांचा अंदाज होता. पण दबंग खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. लवकरच सलमान ‘दस का दम’ या शोच्या तिसऱ्या पर्वात दिसणार आहे. सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या या रिअॅलिटी शोच्या प्रोमोचे सध्या शूटिंग सुरू आहे. त्याचाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या प्रोमोमध्ये तो लोकांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करणार असून त्यासंबंधीचे नियमदेखील सांगताना दिसणार आहे. २००९ मध्ये या रिअॅलिटी शोचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या तिसऱ्या सिझनमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याची माहिती सोनी वाहिनीचे कार्यकारी उपप्रमुख दानिष खान यांनी दिली. अमिताब बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’सारखाच हा एक क्विज शो असून याची संकल्पना थोडी वेगळी आहे. ‘दस का दम’मध्ये स्पर्धक प्रश्नांची उत्तरे टक्केवारीत देतात आणि बक्षिसाची रक्कम १० हजारपासून सुरू होत १० कोटींपर्यंत असते.

नव्या सिझनसाठी शोच्या निर्मात्यांनी एक अॅपसुद्धा तयार केला आहे. या अॅपद्वारे लोकांना घरीबसल्या या स्पर्धेत सहभागी होता येईल. जूनमध्ये हा शो प्रसारित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हा शो बिग बींच्या ‘कौन बनेगा करोडपती’इतकाच प्रसिद्ध होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

First Published on February 14, 2018 1:19 pm

Web Title: dus ka dum salman khan shoots for game show promo