14 November 2019

News Flash

ब्राव्होला आवडते बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री; भेटण्याचीही व्यक्त केली इच्छा…

एका मुलाखतीत ब्राव्होने आपल्या आवडत्या बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव सांगितलं आणि तिच्याबरोबर काय करावंसं वाटतं? हेदेखील सांगितलं.

आयपीएलच्या हंगामात चेन्नईच्या संघाकडून खेळताना विंडीजचा माजी कर्णधार ड्वेन ब्राव्हो याने अष्टपैलू कामगिरी केली. गेल्या अनेक हंगामात त्याने आयपीएलच्या माध्यमातून भारतीय चाहत्यांची मने जिंकली. पण ब्राव्होच्या मनात मात्र बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने घर केलं आहे.

हरभजन सिंग ने एका कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीत ब्राव्होने आपल्या मनातील अनेक गोष्टी उघड केल्या. याच मुलाखतीत ब्राव्होने आपल्या आवडत्या बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव सांगितले आणि तिच्याबरोबर काय करावेसे वाटते? हे देखील सांगितले. ती ब्राव्होची आवडती अभिनेत्री तर आहेच, पण त्या बरोबरच त्याला त्या अभिनेत्रीला भेटायचे आहे आणि तिच्याबरोबर गप्पादेखील मारायच्या आहेत.

ब्राव्हो त्याच्या चॅम्पियन या गाण्यामुळे जगभरात गायक आणि परफॉर्मर म्हणून लोकप्रिय झाला. आयपीएलच्या उदघाटन सोहळयात त्याने या गाण्यावर रणवीर सिंग, कतरीना कैफ आणि जॅकलिन फर्नांडिस या तिघांबरोबर ताल धरला. मात्र त्याला आवडत्या अभिनेत्रीला भेटण्याची त्याची अद्याप पूर्ण झाली नाही.

हरभजनने मुलाखतीदरम्यान ब्राव्होला बॉलिवूडची आवडती अभिनेत्री कोण? असा प्रश्न विचारला. तेव्हा ब्राव्हो म्हणाला की ज्या ज्या वेळी मी भारतात येतो, तेव्हा मला कायम हा प्रश्न विचारला जातो. पण हे कोणतंही गुपित नसून मला दीपिका पदुकोण ही अभिनेत्री आवडते.

दीपिकापर्यंत तुझा कोणता संदेश पोहोचवायचा आहे का? असा प्रश्नही त्यावेळी हजभजनने ब्राव्होला विचारला. त्यावेळी ब्राव्होने दिलखुलासपणे सांगितले की मला कोणता संदेश पोहोचवायचा नाही. मला स्वतःच तिला भेटायचं आहे. तसं झालं तर माझं स्वप्न पूर्ण होईल, असंही ब्राव्हो म्हणाला.

First Published on May 31, 2018 3:01 pm

Web Title: dwayne bravo likes bollywood actress deepika padukone