26 January 2021

News Flash

शूटिंगवर जायला उशीर होतोय; संतापलेल्या ‘रॉक’ने हातांनीच तोडला लोखंडी दरवाजा

VIDEO: संतापलेल्या अभिनेत्याचं शक्ती प्रदर्शन

ड्वेन जॉन्सन हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अभिनयसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी ड्वेनला ‘द रॉक’ म्हणून ओळखले जायचे. तो WWE मधील एक सुपरस्टार रेसलर होता. रॉकने चित्रपटात काम करण्यासाठी रेसलिंग सोडली असली तरी शक्ती प्रदर्शन करण्याची त्याची सवय काही सुटलेली नाही. त्याने आपल्या घराबाहेरील लोखंडी दरवाजा चक्क हातांनीच तोडला. या लोखंडी दरवाज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – हे घर आहे की राजवाडा?; पाहा सुझान खानचं कोट्यवधींचं घर

 

View this post on Instagram

 

Well here’s the destruction I left behind after pulling my gates off myself and going to work. This footage was taken from my security after I had already left and he arrived on the scene. The second video is of our technicians and welders carrying one of the gates and placing it gently in the grass. As you guys know from my last post, there was a power outage at my house, causing my gates to not open. Sure as hell wasn’t my best hour, but there were a lot of people waiting for me at work so I did what I had to do, hopped in my pick up and went to work. Maybe next time I’ll just hop the gates and call an Uber. Actually, no I won’t. There’s no fun in that Jokes aside, THANK YOU to the techs and welders who mobilized very quickly in the morning to come over and take care of the destruction. Thank you, gentlemen. Just one of those days where I wasn’t in the mood. We’ve all been there. #ripgates

A post shared by therock (@therock) on

ड्वेन जॉन्सन सध्या ‘ब्लॅक अॅडम’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात ड्वेन एका सुपरहिरोची भूमिका साकारत आहे. रुपेरी पडद्यावर सुपरहिरो साकारणारा हा अभिनेता खऱ्याखुऱ्या आयुष्यातही सुपरहिरोपेक्षा कमी नाही. त्याला शूटिंवर जाण्यासाठी उशीर झाला होता. त्याच्या घराबाहेरी कुंपणाचा गेट रिमोर्टवर चालतो. परंतु तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. अखेर संतापलेल्या रॉकने हातांनीच त्या गेटला तोडून टाकलं. हा व्हिडीओ त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला आहे. रॉकची ताकत पाहून चाहते भारावून गेले आहेत. चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 6:24 pm

Web Title: dwayne johnson rips off a metal gate with bare hands mppg 94
Next Stories
1 ‘हे’ कपल दिसणार बिग बॉस १४मध्ये?
2 “अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन”; पायल घोषने दिली धमकी
3 Video: नेहा कक्कर आणि बदशाहचे नवे गाणे प्रदर्शित
Just Now!
X