WWE स्टार म्हणून ओळखला जाणारा ड्वेन जॉन्सन म्हणजेच द रॉक अनेकांच्याच फेव्हरेट लिस्टमध्ये अग्रस्थानी असतो. सध्याच्या घडीला रॉकने WWE मधून काढता पाय घेतला असता तरीही कलाविश्वात मात्र तो दमदार कामगिरी करताना दिसत आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक कमाई करणाऱ्या ड्वेन जॉन्सनने प्रेयसी लॉरेन हॅशनसोबत लग्न केलं असून त्यांच्या लग्नाचे काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

ड्वेनने १८ ऑगस्ट रोजी नातेवाईक आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीमध्ये लॉरेनसोबत लग्न केलं. सूत्रांच्या माहितीनुसार, ड्वेन आणि लॉरेन २००७ पासून एकमेकांना डेट करत होते. विशेष म्हणजे या दोघांना एक मुलगादेखील आहे. ड्वेनचं हे दुसरं लग्न असून यापूर्वी त्याने डॅनीसोबत लग्न केलं होतं.

 

View this post on Instagram

 

We do. August 18th, 2019. Hawaii. P (blessed) @laurenhashianofficial @hhgarcia41

A post shared by therock (@therock) on

दरम्यान, ड्वेनने १९९७ साली आपल्या कॉलेजच्या मैत्रिणीसोबत म्हणजेच डॅनीसोबत लग्न केलं होतं. मात्र काही कौटुंबिक कारणांमुळे या दोघांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. त्यानंतर ड्वेन लॉरेनला डेट करत होता. WWE मधून संन्सास घेतल्यानंतर ड्वेनने ‘द स्कॉर्पियन किंग’, ‘फास्ट अॅण्ड फ्युरियस’सह अनेक सुपरहिट वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.