हॉलीवूड अभिनेता द रॉक म्हणजेच ड्वाइन जॉन्सनला नुकताच कन्यालाभ झाला. रॉकने त्याच्या लेकीचे नाव जास्मिन असे ठेवले असून तिच्यासोबतचा एक सुंदर फोटो त्याने पोस्ट केला आहे.
रॉकच्या छातीवर त्याची चिमुरडी लेक झोपलेली दिसते. रॉकने लिहलेयं की, यंदाचा ख्रिसमस आधीच आला. जन्मल्यानंतर अगदी काही मिनिटांतच ती आपल्या वडिलांच्या छातीवर झोपली आहे. तसेच, रॉकने सर्व चाहत्यांच्या प्रार्थनांसाठी कृतज्ञता व्यक्त केली असून, प्रेयसी लॉरेनचेही आभार मानले.
१६ डिसेंबरला रॉक आणि लॉरेनला कन्यालाभ झाला. याआधी पहिल्या पत्नीपासून रॉकला १४ वर्षांची मुलगी आहे.