हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या घरी दरवर्षी गणेशोत्सवाची मोठी धूम असते. यंदा मात्र करोना आणि टाळेबंदीमुळे उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळणार नसला तरी गणेशोत्सवाआधी मिळालेल्या इतक्या सुट्टीचा फायदा घेत गणेशमूर्ती बनवण्यापासूनच कलाकार मंडळींनी उत्सवाचा शुभारंभ के ला आहे. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीनेच साजरा करण्याचे आवाहन कलाकारांनी के ले आहे. हिंदी टेलीविश्वातील अनेक कलाकारांनी यंदा घरीच गणेशमूर्ती बनवली आहे, तर बॉलीवूडमधील अभिनेत्री भूमी पेडणेकर, नम्रता शिरोडकर यांनी इको फ्रे ंडली गणेशमूर्ती घरी आणली असून इतरांनीही अशाच पद्धतीची मूर्ती आणून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी के ले आहे.

बॉलीवूडमध्ये दोन वर्षांपूर्वीपर्यंत आर. के . स्टुडिओच्या गणपतीची धूम असायची. मात्र आता कपूर कु टुंबीयांनी स्टुडिओ विकल्यापासून सत्तर वर्षांची परंपरा असलेला आर.के. स्टुडिओचा गणेशोत्सव इतिहासजमा झाला आहे. प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्या गणपतीबरोबरच िंहंदीत अभिनेता सलमान खान, नील नितीन मुकेश, सोनू सूद, शिल्पा शेट्टी, गोविंदा, जितेंद्र अशा कित्येक कलाकारांकडे गणपतीची प्रतिष्ठापना के ली जाते. मात्र यंदा या उत्सवावर असलेले करोनाचे सावट पाहता बॉलीवूडमध्येही साधेपणानेच गणेशोत्सव साजरा होताना दिसतो आहे. त्यातल्या त्यात हिंदीतील टेलीविश्वातील कलाकारांनी मात्र यंदा गणेशोत्सवात घरी राहून साधेपणाने पण नेहमीच्या उत्साहात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. अभिनेता राके श बापट दरवर्षी स्वत: घरी गणेशमूर्ती घडवतो. याहीवर्षी त्याने घडवलेली गणेशमूर्ती त्याच्या घरी विराजमान झाली आहे. राकेशचाच कित्ता त्याच्या टेलीविश्वातील दोन सहकाऱ्यांनीही गिरवला आहे. टाळेबंदीमुळे घरीच असलेल्या अभिनेता रित्विक धनजानीने १५ ऑगस्टपासूनच घरी गणेशमूर्ती घडवायला सुरुवात के ली होती. गणेशाची सेवा करण्याचा यासारखा दुसरा आनंद नाही असे म्हणत त्याने गणेशमूर्ती घरीच घडवणार असल्याचेही ट्विटरवरून जाहीर के ले होते. अभिनेता करण वाहीनेही घरीच गणेशमूर्ती बनवली आहे. तर ‘कुमकु म’सारख्या मालिकांमधून काम के लेल्या अभिनेत्री जुही परमारनेही घरीच गणेशमूर्ती घडवली आहे. तिच्याकडे गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव साजरा के ला जातो. मराठीतही अभिनेत्री स्मिता तांबे, दिग्दर्शक रवी जाधव अशी कलाकार मंडळी स्वत:च गणेशमूर्ती घडवतात.

टेलीविश्वात गणेशोत्सवाची जाग पाहायला मिळत असली तरी हिंदीत अभिनेत्री शिल्पा शेट्टी वगळता कोणी गणेशोत्सवाबद्दल फारशी चर्चा करताना दिसत नाही आहे. अभिनेता सोनू सूद अजूनही स्थलांतरितांसाठीच्या मदतकार्यात गुंतला आहे. त्याच्याकडे नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा होईल. अभिनेत्री भूमी पेडणेकरनेही ‘ट्री गणेशा’ची स्थापना के ली असून ती समाजमाध्यमांवरून या ट्री गणेशोत्सवाचा प्रचारही क रते आहे. अशाप्रकारे पर्यावरणपूरक गणेशपूजा करण्यावर सगळ्यांनी भर दिला पाहिजे, असेही तिने म्हटले आहे. तर दरवर्षी घरी गणेशोत्सव दणक्यात साजऱ्या करणाऱ्या अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचे भान बाळगण्याचे आवाहन के ले आहे. दरवर्षी गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यांवर वाहून येणारे भग्न मूर्तीचे अवशेष आणि इतर गोष्टींचे व्हिडीओ, छायाचित्रे समाजमाध्यमांवरून व्हायरल आहेत. या व्हिडीओ आणि छायाचित्रांचा दाखला देत श्रद्धाने गणेशोत्सव आनंदात साजरा के ल्यानंतर या गोष्टी पाहाव्या लागणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. हे टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, कृत्रिम तलावात विसर्जन या गोष्टी कटाक्षाने के ल्याच पाहिजेत, असे तिने म्हटले आहे. अभिनेत्री नम्रता शिरोडकरनेही आपल्या घरी आणलेल्या ट्री गणेशाचे स्वागत करतानाच गणेशोत्सवाची ही संकल्पना वेगळी असल्याचे म्हटले आहे. या गणेशमूर्तीचे विसर्जन के ल्यानंतर तीच माती कुं डीत टाकू न झाडे लावली जाऊ शकतात. त्यामुळे पर्यावरणाशी जुळवून घेत नवनिर्मिती साधणारी ही संकल्पना आपल्याला जास्त भावली असल्याचेही तिने सांगितले आहे. एकं दरीतच गेल्या काही वर्षांत कलाकार मंडळी पर्यावरणाचे भान जपताना दिसत आहेत. पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, अशाच गोष्टी के ल्या पाहिजेत. विशेषत: करोनाच्या काळात टाळेबंदीमुळे कमी झालेले प्रदूषण आणि शहरात परतलेले पक्षी, बहरलेला निसर्ग पाहिल्यानंतर या गोष्टींची जाणीव ठळकतेने होताना दिसते आहे. सेलिब्रिटींच्या गणेशोत्सवात यंदा याच पर्यावरणाप्रति असलेल्या जाणिवेचे प्रतिबिंब उमटताना दिसते आहे.