हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची खास ओळख निर्माण केलेले दिवंगत अभिनेते ‘भगवानदादा’ यांच्या आयुष्यावर आधारित ‘एक अलबेला’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्त निवडण्यात आला. येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या माध्यमांतून चित्रपटाचे प्रमोश केले जाणार आहे.
‘भगवानदादां’ची भूमिका साकारणारा अभिनेता मंगेश देसाई, तसेच भगवानदादांच्या पत्नीची भूमिकेत दिसणारी अभिनेत्री तेजस्वी पाटील या वेळी उपस्थित होते. चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल, कार्यकारी निर्माता कुणाल शेट्ये हे देखील उपस्थित होते. गुढी उभारल्यानंतर चित्रपटाच्या टीमनं ‘भगवानदादा’ स्टाईल’नं डान्स करून अनोख्या पद्धतीनं ‘भगवानदादा’ना अभिवादन केलं.
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनचं या चित्रपटातील गीता बाली यांच्या भूमिकेद्वारे प्रथमच मराठीत पदार्पण करणार आहे. विद्या बालनच्या मराठीतील पदार्पणामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या टीजरची भरपूर प्रशंसा झाली .