News Flash

तरला जोशी यांच्या निधनानंतर सहकलाकार निया शर्मा भावूक

नियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रविवारी तरला जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘एक हजारों में मेरी बहना है’मध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन झाले आहे. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने अभिनेत्री निशा शर्माला धक्का बसला आहे.

तरला जोशी यांचे रविवारी निधन झाले. मात्र, त्यांच्या निधनाचे कारण अजून समोर आलेले नाही. निया शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. नियाने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर केली आहे. या फोटोत निया आणि तिचे सहकलाकार दिसत आहेत. निया तरला जोशी यांच्या जवळ बसलेली आहे. “तरला जी तुम्ही नेहमीच आमच्या बीजी रहाल,” असे कॅप्शन देखील नियाने दिले आहे. एवढंच नाही तर नियाने तिच्या एक फॅन पेजची स्टोरी देखील शेअर केली होती. ती पोस्ट शेअर करत “तुमच्या आत्म्याला शांती मिळो, बीजी तुमची आठवण नेहमी येईल,” असे निया म्हणाली होती.

nia-sharma-shared a photo नियाने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर केली आहे.

 

तरला जोशी या छोट्या पडद्यावरील ‘बा’ म्हणून ओळखल्या जात होत्या. कारण त्यांनी अनेक मालिकांमध्ये ‘बा’ ची भूमिका साकारली होती. तरला जोशी यांनी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 4:08 pm

Web Title: ek hazaron main meri behna hai actress tarla joshi passes away nia sharma shared a photo and said will miss you dcp 98
Next Stories
1 “सुशांत ड्रग्ज घेतो हे कुटुंबीयांना माहिती होते”, रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा
2 ‘Indian Idol 12’ च्या सेटवर ‘झीनी बेबी’ची एन्ट्री; रिक्रिएट केला १९७९ सालच्या ‘द ग्रेट गॅम्बलर’चा सीन
3 सोनालीने कर्करोगावरील उपचार घेतानाचा जुना फोटो केला ट्वीट; म्हणाली…
Just Now!
X