News Flash

‘साराभाई’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन

'एक हजारो में मेरी बेहना है' मालिकेत त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

जेष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचे रविवारी निधन झाले आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’मध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन झाले आहे. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तरला जोशी यांच्या निधनाचे कारण अजूनही समोर आलेले नाही. तरला जोशी यांच्या मृत्यूच्या बातमीने टीव्ही जगतात शोककळा पसरली आहे. लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून तरला जोशी यांना श्रद्धांजली वाहात आहेत. तरला जोशी या छोट्या पडद्यावरील ‘बा’ म्हणून ओळखल्या जात होत्या.

तरला जोशी यांनी ‘बंदिनी’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ आणि ‘एक हजार में मेरी बेहना है’ यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. ‘बंदिनी’ या मालिकेतून तरला यांना खरी ओळख मिळाली होती. तर ‘एक हजार में मेरी बेहना है’ या मालिकेत त्यांनी अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डिसूझासोबत काम केले होते. ‘एक हजारो में मेरी बेहना है’ मालिकेत त्यांनी त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 11:55 am

Web Title: ek hazaron main meri behna hai fame tarla joshi sudden demise dcp 98
Next Stories
1 यामी गौतम पाठोपाठ ‘ये जवानी…’मधील ‘लारा’ने केले लग्न
2 “व्हाटस्अप मेसेजवर विश्वास ठेवू नका”, दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर
3 ४६ वर्षांच्या एकता कपूरने सांगितले होते लग्न न करण्यामागचे कारण
Just Now!
X