25 November 2020

News Flash

‘दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड’मध्ये ‘एक होतं पाणी’ला सात नामांकने

सामाजिक विषयावरील उत्कृष्ट चित्रपट

भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार सोहळा मराठी सिनेजगतात अतिशय सन्मानाचा समजला जातो. या पुरस्कारासाठी व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज यांची निर्मिती असलेल्या ‘एक होतं पाणी’ या चित्रपटाची निवड झाली आहे. डॉ.प्रविण भुजबळ व विजय तिवारी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर रोहन सातघरे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. ‘एक होता राजा, एक होती राणी..उद्या म्हणू नका,एक होतं पाणी’ अशी हटके टॅगलाईन असलेल्या या चित्रपटातून दाहक वास्तव मांडण्यात आलं आहे.

‘ दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड २०१९’मध्ये या चित्रपटाला एकूण सात नामांकन मिळाले आहेत. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट खलनायक, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट गायिका, सर्वोत्कृष्ट गीतकार असे एकूण सात नामांकनं मिळाली आहेत.

या चित्रपटात अनंत जोग, हंसराज जगताप, श्रीया मस्तेकर, चैत्रा भुजबळ, गणेश मयेकर, यतीन कारेकर, रणजित जोग, दीपज्योती नाईक, त्रिशा पाटील, जयराज नायर, आशिष निनगुरकर, डॉ.राजू पाटोदकर, शीतल शिंगारे, शीतल कल्हापुरे व उपेंद्र दाते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन व गीते आशिष निनगुरकर यांनी लिहिली असून संगीतकार म्हणून विकास जोशी यांनी काम केले आहे. ऋषिकेश रानडे, आनंदी जोशी, रोहित राऊत व विकास जोशी यांनी या गाण्यांना आवाज दिला आहे. हा चित्रपट मागच्या वर्षी उन्हाळ्यात प्रदर्शित झाला होता. आतापर्यंत या सिनेमाला विविध फेस्टिव्हलमध्ये गौरविण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 3:01 pm

Web Title: ek hota pani marathi movie got seven nominations in dadasaheb phalke golden camera awards ssv 92
Next Stories
1 Video : ‘क्यूँ की तुम मेरी बेटी हो’; देशातील मुलींसाठी विद्या बालनची हृदयस्पर्शी कविता
2 ‘पावर स्टार’ला महानगरपालिकेचा दणका; राम गोपाल वर्मांना ठोठावला दंड
3 प्रसाद ओकच्या मुलाला दहावीत मिळाले इतके टक्के; सोशल मीडियावर लिहिली पोस्ट
Just Now!
X