03 March 2021

News Flash

Video : ‘एक सांगायचंय… Unsaid Harmony’ चा ट्रेलर प्रदर्शित

नातेसंबंधांवर भाष्य करणारी एक अत्यंत संवेदनशील कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

अभिनेता के.के मेननचं मराठीतलं पदार्पण, अभिनेता लोकेश विजय गुप्तेचं दिग्दर्शकीय पदार्पण म्हणून ‘एक सांगायचंय…Unsaid Harmony हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. देवी सातेरी प्रॉडक्शननं या चित्रपटाची निर्मिती केली असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न झाला.

नातेसंबंधांवर भाष्य करणारी एक अत्यंत संवेदनशील कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. लोकेश विजय गुप्ते यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन,संकलनही केलं आहे. तर चित्रपटाचं गीतलेखन जितेंद्र जोशी, संगीत दिग्दर्शन शैलेंद्र बर्वेनं केलं आहे.

दरम्यान, या चित्रपटामध्ये के.के मेनन आणि राजेश्वरी सचदेव यांच्यासह चित्रपटात पद्मावती राव, मिलिंद फाटक, अजित भुरे, विनीत शर्मा, शाल्व किंजवडेकर, हर्षिता सोहल, शुभवी गुप्ते, विभव राजाध्यक्ष, अभिजित अमकर, सचिन साळवी आदींच्या मुख्य भूमिका आहेत.
के.के मेनन आणि राजेश्वरी सचदेव यांच्या तगड्या अभिनयाची जुगलबंदी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार असून येत्या १६ नोव्हेंबरला हा तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 3:51 pm

Web Title: ek sangaychay unsaid harmony official trailer
Next Stories
1 ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची ‘ग्रेटभेट’
2 ‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’
3 #MeToo : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप
Just Now!
X