21 October 2019

News Flash

‘एक थ्रीलर नाईट’

अस्मित पटेल याने आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून त्याची प्रमुख भूमिका असलेल्या ''एक थ्रीलर नाईट'' या नव्या मराठी चित्रपटाचा

| April 28, 2015 11:32 am

अस्मित पटेल याने आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून त्याची प्रमुख भूमिका असलेल्या  ”एक थ्रीलर नाईट” या नव्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईत पार पडला. सद्यस्थितीतील तरुणाईवर प्रकाशझोत टाकणारा ”एक थ्रीलर नाईट” हा रहस्यमय थरारपट असून या चित्रपटात प्रामुख्याने सर्वच कलाकार तरुण आहेत. ‘ग्लैम फेम एन्टरटेन्मेंट’ ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अस्मित पटेल, केतन पेंडसे, निखिल वैरागर, संस्कृती बालगुडे, खुशबू तावडे, तितिक्षा तावडे आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय अन्य कलाकारांमध्ये निरंजन कुलकर्णी, कुणाल चोरडिया, एलेना कझान (बॉलीवूड आणि हॉलीवूड अभिनेत्री ) आदींचा समावेश आहे. या चित्रपटाची कथा-संकल्पना केतन पेंडसे यांची असून पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रदीप मेस्त्री यांनी केले आहे. समीर आठल्ये यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली असून, केतन पेंडसे आणि चेतन भूमकर यांच्या गीतांना शंतनू दास यांनी संगीत दिले आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका खास समारंभात अस्मित पटेल यांच्या हस्ते मुहुर्ताचा शॉट पार पडला. याप्रसंगी केतन पेंडसे, निखिल वैरागर, संस्कृती बालगुडे, खुश बू तावडे, तितिक्षा आदीं प्रमुख कलाकारांसह चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप मेस्त्री आणि इतर कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. 

First Published on April 28, 2015 11:32 am

Web Title: ek thriller night marathi movie
टॅग Marathi Movie