News Flash

अभिनेत्रींनी स्वीमसूटमध्ये दिली ‘नागिन ५’साठी ऑडिशन; व्हिडीओ व्हायरल

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

छोट्या पडद्यावरी लोकप्रिय मालिका म्हणजे नागिन. या मालिकेच्या ४ पर्वांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. या मालिकेची निर्माती आहे एकता कपूर. मालिका यशस्वी होण्याचे यापेक्षा वेगळे कारण काय असू शकते. मालिका कुठे खेचायची, कुठे ताणायची, कुठे रंजक वळण आणायचे आणि कुठे थांबायचे यावर तिचा बराच अभ्यास आहे. म्हणूनच ‘नागिन’ या मालिकेचे चार पर्व प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरले आहेत. मालिकेचे चौथे पर्व सुरु असतानाच पाचवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. नुकताच सोशल मीडियावर एकता कपूर नागिन ५ चे ऑडिशन घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सध्या एकता कपूर नवीन वर्षाचे स्वागत करत थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिच्या सोबत तिचे मित्रमैत्रिणी अनिता हसनंदानी, करिश्मा टंडना, विकास गुप्ता, रोहित रेड्डी आणि रिधिमा पंडित असल्याचे दिसत आहे. दरम्यान त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये एकता मस्ती करत ‘नागिन ५’साठी अभिनेत्रींचे ऑडिशन घेत असल्याचे म्हणत आहे. त्यानंतर निर्माता स्विमिंग पूलमध्ये असलेल्या तीन अभिनेत्री करिश्मा, अनिता आणि रिधिमाकडे बोट दाखवतो. त्यानंतर त्या तिघीही ‘मै नागिन नागिन’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. सध्या त्यांचा स्विमिंगपूलमधील नागिन डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सध्या कलर्स वाहिनीवर ‘नागिन ४’ ही मालिका सुरु आहे. या मालिकेत अभिनेत्री निया शर्मा, विजेंद्र कुमेरिया, सायंतनी घोष आणि जॅसमीन भसीन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एकता ‘नागिन’ या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे म्हटले जात होते. तसेच या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ किंवा प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 1:19 pm

Web Title: ekta kapoor holds naagin 5 auditions in pool avb 95
Next Stories
1 विद्याच्या साडीचे किस्से; अशी लढवली शक्कल की नातेवाईकही होतात खूश
2 Video: सेलिब्रिटींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा, म्हणाले…
3 BIRTHDAY SPECIAL : कर्करोगावरही मात करणाऱ्या सोनालीचा प्रेरणादायी प्रवास
Just Now!
X