24 October 2020

News Flash

…म्हणून एकता तिच्या बाळाचे फोटो करत नाही शेअर, तुषार कपूरचा खुलासा

एकताच्या मुलाचं नाव 'रवी' कपूर असं आहे

एकता कपूर

बालाजी टेलिफिल्म्सची सर्वेसर्वा एकता कपूरने २७ जानेवारी रोजी एका मुलाला जन्म दिला. एकताने सरोगसी पद्धतीने मुलाला जन्म दिला असून ती एकल मातृत्वाचा अनुभव घेत आहे. एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर हा देखील सरोगसीच्या माध्यमातून सिंगल पॅरेंट बनला होता. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत आता एकताही सिंगल मदर बनली आहे. एकताच्या मुलाचं नाव ‘रवी’ कपूर असं ठेवण्यात आलं असून अद्यापही एकताने तिच्या मुलाला प्रसारमाध्यमांसमोर आणलेलं नाही. मात्र एकताने आपल्या मुलाचा चेहरा चाहत्यांना का दाखविला नाही, या मागचं कारण तुषार कपूरने नुकतंच सांगितलं आहे.

सध्या पाहायला गेलं तर अनेक जण लहान बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र नुकत्याच जन्मलेल्या बाळांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाहीत,असा समज आजही काहींमध्ये पाहायला मिळतो. त्याप्रमाणेच एकताचंदेखील तिच्या बाळाच्या बाबतीत असंच काहीस मत आहे. त्यामुळे ती तिच्या बाळाचे रवीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही.

“रवी अजून लहान आहे, त्यामुळे त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे की नाही याविषयी घरात चर्चा झाली होती आणि या चर्चेअंती रवीचे फोटो अद्यापतरी सोशल मीडियावर शेअर करायचे नाहीत असं ठरलं. तो मोठा झाल्यावर त्याचे फोटो एकता स्वत: चाहत्यांसोबत शेअर करेल”, असं तुषारने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले की ते क्षणार्थात व्हायरल होतात. त्यामुळेच मुलांचे फोटो शेअर करण्यास आमच्या घरातल्यांचा कायम नकार असतो. आता आमचा लक्ष्य मोठा झाला आहे, त्यामुळे त्याचे फोटो करण्यास आम्हाला कोणतीच अडचण नाही, त्याप्रमाणेच जेव्हा रवी मोठा होईल तेव्हा आम्ही त्याचे फोटो शेअर करु”.

दरम्यान, एकता सरोगसी पद्धतीने आई झाली असून बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत ज्यांना सरोगसी पद्धतीचा अवलंब करुन पालकत्व स्वीकारलं आहे. बॉलिवूडमध्ये तुषार कपूर प्रमाणेच करण जोहर हा देखील सिंगल पॅरेंट आहे. त्यालाही सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळी मुलं आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 3:50 pm

Web Title: ekta kapoor never shares pictures of her son ravi kapoor ssj 93
Next Stories
1 ‘प्रसिद्धीपासून लांब राहणाऱ्या गिरीशबाप्पांच्या मागे प्रसिद्धीच अनाहूतपणे यायची’
2 शिक्षणावरून प्रश्न उठवणाऱ्यांना अनन्या पांडेनं दिले पुरावे
3 विराट प्रेमात पडावं असाच आहे; अनुष्कानं सांगितलं अनोखं कारण
Just Now!
X