News Flash

एकता कपूरमुळे पहलाज निहलानी यांना सोडावं लागलं अध्यक्षपद?

पहलाज यांच्या उचलबांगडीमागे स्मृती इरानी आणि एकताची मैत्रीही असल्याचे म्हटले जातेय

एकता कपूर आणि पहलाज निहलानी

पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाचे पद अचानक सोडावे लागले याची अनेक कारणं आहेत असे सांगण्यात येते. यापैकी एक कारण म्हणजे एकता कपूरसोबत झालेला वाद असावा असे म्हटले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून निहलानी यांच्याविरोधात सिनेनिर्माते तक्रार करत आहेत. तसेच, नवाजुद्दीन सिद्दीकीची मुख्य भूमिका असलेल्या ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या सिनेमातील ५० हून अधिक दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. ही गोष्ट या सिनेमाच्या निर्मात्यांना पटली नाही. त्यांनीही निहलानी विरोधात तक्रार नोंदवली.

अंकिता लोखंडेच्या फोटोंची नेटिझन्सनी उडवली खिल्ली

पहलाज आणि सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांसोबत गैरव्यवहार केल्याच्या बातम्या सातत्याने येऊ लागलेल्या. या सर्व तक्रारींमुळेच निहलानी यांना हे पद सोडावे लागले असे म्हटले जात आहे. पण यामागे एकता कपूर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून एकता आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यामध्ये वाद सुरू आहेत. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सिनेमाच्या प्रदर्शनामध्ये सेन्सॉर बोर्डाने अनेक व्यत्यय आणले होते. या सिनेमासोबतचा वाद हा जवळपास वर्षभरापासून सुरू होता.

पहलाज यांच्या उचलबांगडीमागे स्मृती इरानी आणि एकताची मैत्रीही असल्याचे म्हटले जातेय. स्मृती इराणी यांना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत. त्यांच्या या पदामुळे एकताचा मार्ग थोडा सुकर झाला. यानंतर एकताने पहलाज यांचा जोरदार विरोध करायला सुरूवात केली. निहलानी यांना पदावरुन हटवण्यासाठी ती जोरदार प्रयत्न करत होती. एकताचीच निर्मिती असलेल्या ‘उडता पंजाब’ या सिनेमालाही सेन्सॉर बोर्डाने रखडवले होते.

सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून प्रसून जोशी यांची निवड करण्यात आली आहे. निर्मात्यांमध्ये प्रसून फार लोकप्रिय आहेत तसेच ते प्रसारमाध्यमांशी मोकळेपणाने बोलतात. अभिनेत्री विद्या बालनही सेन्सॉर बोर्डाच्या समितीची सदस्य झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 3:48 pm

Web Title: ekta kapoor pahlaj nihalani censor board chief lipstick under my burkha prasoon joshi
Next Stories
1 ‘या’ कारणामुळे झाला सुशांतचा पहिला ब्रेकअप
2 …म्हणून जॉनी लिवर यांना झालेला तुरुंगवास?
3 ‘बर्थडे गर्ल’ सुनिधी चौहानला लागली मातृत्वाची चाहूल
Just Now!
X