21 February 2019

News Flash

Kasautii Zindagii Kay 2: अशी असेल एकताची नवी ‘कोमोलिका’

प्रत्येक मालिकेमध्ये एक तरी खलनायक किंवा खलनायिका ही असतेच असते.

कसौटी जिंदगी की २

एकता कपूरची बहुप्रतिक्षित ठरलेली ‘कसौटी जिंदगी की- २’ ही मालिका काही दिवसापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. प्रसारित झालेल्या या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवल्या आहे. या मालिकेतील जवळपास सगळ्याच पात्रांचा खुलासा झाला असला तरी या मालिकेतील महत्वाचं पात्र अर्थात कोमोलिकाच्या नावावरचा पडदा उचलण्यात आला नाही. अद्यापही यात कोमोलिकाची भूमिका कोण साकारणार हे जाहीर झालेलं नाही.

प्रत्येक मालिकेमध्ये एक तरी खलनायक किंवा खलनायिका ही असतेच असते. त्यानुसारचं ‘कसौटी…’ मध्येदेखील कमोलिका हे खलनायिकेचं पात्र आहे. या भूमिकेसाठी आतापर्यंत अनेक अभिनेत्रींच्या नावाची चर्चा झाला असून हिना खान या भूमिकेत झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु नुकतचं एकताने ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत नवीन कोमोलिका कशी असेल याविषयी सांगितलं आहे.

‘कसौटी जिंदगी… ‘मधील कोमोलिका प्रत्येक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली होती. त्यामुळे ‘कसौटी…’च्या सिक्वलमध्ये नव्या कमोलिकाला सादर करणं हे खरंच एक आवाहन आहे. कोमोलिका म्हटलं की डोळ्यासमोर येतं तिच्या अभिनयाच्या विविध छटा, तिचे नखरे. ‘कसौटी…’ मध्ये असलेला तिचा हाच तोरा सीक्वलमध्येही पाहता येणार आहे. मात्र यावेळी त्यात थोडासा बदल केला आहे. त्यामुळे ही नवी कोमोलिकाही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरेल यात शंका नाही, असं एकताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, एकताने कोमोलिकाच्या या नव्या रुपाचं वर्णन जरी केलं असलं तरी ही भूमिका कोण वठविणार हे अजूनही गुलदस्त्यात ठेवलं आहे. मात्र कोमोलिकाची या मालिकेमध्ये एण्ट्री झाल्यानंतर हे कथानक नवं वळणं घेईल यात शंका नाही.

 

First Published on October 12, 2018 3:12 pm

Web Title: ekta kapoor reveals new komolika in kasautii 2