News Flash

एकता आणि तुषारकडे लग्नासाठी नाही वेळ

आधुनिकतेबरोबर माणसाचे जीवनदेखील खूप व्यस्त होत चालले आहे. या व्यस्त जीवनशैलीचा थेट परिणाम त्याच्या लग्न करण्यावर होऊ लागल्याचे दिसते. होय! याच कारणामुळे टीव्ही मालिकांची सम्राज्ञी

| December 23, 2013 12:57 pm

आधुनिकतेबरोबर माणसाचे जीवनदेखील खूप व्यस्त होत चालले आहे. या व्यस्त जीवनशैलीचा थेट परिणाम त्याच्या लग्न करण्यावर होऊ लागल्याचे दिसते. होय! याच कारणामुळे टीव्ही मालिकांची सम्राज्ञी एकता कपूर आणि अभिनेता तुषार कपूरला लग्नाचा विचार करायलादेखील वेळ मिळत नाहीये. या विषयी बोलताना अभिनेता जितेंद्र म्हणाले, एकता आणि तुषार ही त्यांची दोन्ही मुले कामात खूप व्यस्त असून, त्यांना लग्नाचा विचारदेखील करायला वेळ नाही. प्रत्येक वडिलांना त्यांची मुले प्रिय असल्याचे मत व्यक्त करीत ते गंमतीने म्हणाले, बाप म्हणून आपल्याला त्यांच्याविषयी चांगलेच बोलायला हवे, अन्यथा त्यांचा मार खावा लागेल. ते पुढे म्हणाले, वडील म्हणून मुलांची खूप काळजी वाटते, जी मरेपर्यंत वाटत राहील. आजचा काळ हा ठरवून लग्न करण्याचा काळ नाही. त्यांना स्वतःलाच त्यांचा जोडीदार निवडावा लागेल. परंतु, ते त्यांच्या कामात एवढे व्यस्त आहेत, की त्यांना लग्नाचा विचार करायला देखील वेळ नाही. याबाबत मी काहीही करू शकत नाही, जे काही करायचे आहे ते त्यांनीच करायचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 12:57 pm

Web Title: ekta tusshar too busy for marriage jeetendra
Next Stories
1 शर्लिनचा ‘कामसूत्र ३डी’ हा ‘ब दर्जा’चा पॉर्न चित्रपट नाही
2 पाहाः कंगनाच्या ‘क्वीन’ चित्रपटाचा ट्रेलर
3 पाकिस्तानच्या मोबाईल कंपनीची ब्रँण्ड अॅम्बेसेडर करिना!
Just Now!
X