बॉलिवूड गायिका कनिका कपूरची करोना चाचणी पॉझिटीव्ह येताच सर्व चित्रपसृष्टीमध्ये खबळल उडाली. कनिका लंडनहून भारतात परतताच ३५० ते ४०० लोकांच्या संपर्कात आली होती. त्यामुळे या सर्वांची संभाव्य यादी करुन त्यांची करोना चाचणी घेण्याची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागाने घेतली. आता कनिका जेथे राहिली होती तेथील ३५ लोकांची करोना चाचणी घेण्यात आली होती.
आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार कनिका १३ मार्च रोजी लंडनहून परत येताच तिच्या काकांसोबत कल्पना टॉवरमध्ये थांबली होती. या टॉवरमध्ये त्यावेळी ३५ लोकं उपस्थित होते. या ३५ लोकांची करोना चाचणी केली आहे. त्यापैकी ११ लोकांची चाचणी निगेटीव्ह आली आणि उरलेल्या २४ लोकांचे करोना चाचणी रिपोर्ट येणे बाकी आहे.
Eleven of the 35 occupants of Kalpana Tower where #Bollywood singer #KanikaKapoor stayed with her uncle on March 13, have tested negative for #Coronavirus. The reports of 24 persons are awaited. #Covid19India #COVID19outbreak pic.twitter.com/CbWSi1PGhX
— IANS Tweets (@ians_india) March 24, 2020
तर दुसरीकडे कनिकाच्या संपर्कात आलेल्या २६६ जणांचा शोध घेतला जात आहे. त्यातील ६० पेक्षा अधिक लोकांची करोना चाचणी करण्यात आली. त्या ६०ही लोकांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. जवळपास कनिकाच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींची यादी करुन करोना चाचणी करण्यात येत आहे. कारण कनिकाची दुसरी करोना चाचणी देखील पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे.
कनिकाची पहिल्यांदा चाचणी केल्यावर आलेल्या रिपोर्टमध्ये तिचे वय आणि लिंग यांची माहिती चुकीची देण्यात आली होती. त्या रिपोर्टमध्ये कनिकाचे वय २८ वर्षे व लिंग महिला ऐवजी पुरुष लिहिण्यात आले होते. त्यामुळे या रिपोर्टवर तिच्या कुटुंबीयांनी शंका उपस्थित केली होती. पण आता दुसरी चाचणीचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येताच त्यांची शंका दूर झाली असल्याचे म्हटले जाते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 24, 2020 3:48 pm