अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला आहे. परिणामी स्टारकिड्सवर सध्या जोरदार टीका होत आहे. शिवाय त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्याचीही मागणी केली जात आहे. या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेत्री अली अव्हराम हिने उडी घेतली आहे. “एकतर संघर्ष करा किंवा बॅग भरुन घरी जा” असा सल्ला तिने बॉलिवूडमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नव्या कलाकारांना दिला आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – आली लहर केला कहर; अभिनेत्रीने वाढदिवशी केला ११ हजार फुटांवरुन स्टंट

सनी देओलच्या ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या अली अव्हरामने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत घराणेशाहीवर भाष्य केलं. ती म्हणाली, “बाहेरुन आलेल्या कलाकारांसाठी बॉलिवूडमध्ये स्थान प्रस्थापित करणं अत्यंत कठीण असतं. मी जेव्हा इथे आले तेव्हा मी कोणालाही ओळखत नव्हते. मला सल्ला देण्यासाठी देखील कोणी नव्हतं. मी बराच संघर्ष केला अन् कामं मिळवली. बॉलिवूडमध्ये काम करताना तुम्हाला घराणेशाही आणि गटबाजीचा त्रास होतोच. काही निर्माते तर ठराविक कलाकारांसोबतच काम करतात. अशा वेळी नैराश्य देखील येतं. पण नव्या कलाकारांकडे संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. जर संघर्ष करण्याची तयारी नसेल तर नव्या कलाकारांनी बॅग घेऊन थेट घर गाठावं.” असा सल्ला तिने नव्या कलाकारांना दिला आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – सुनेच्या आरोपांवर महेश भट्ट यांचं प्रत्युत्तर; ठोकला १ कोटींचा मानहानिचा दावा

अली अव्हराम ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध आभिनेत्री आहे. २०१३ साली ‘मिकी व्हायरस’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘पोस्टर बॉईस’, ‘नाम शबाना’, ‘किस किस को प्यार करु’, ‘मलंग’, ‘पॅरिस पॅरिस’, ‘बझार’, ‘बटरफ्लाय’ यांसारख्या चित्रपटांत तिने काही लहानमोठ्या भूमिका साकारल्या. दरम्यान भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत असलेल्या रिलेशशिपमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. मात्र त्यांचं नात दिर्घकाळ चाललं नाही. अंतर्गत मतभेदांमुळे वर्षभरातच त्यांचं ब्रेकअप झालं.