News Flash

मृत्यृनंतरही ‘हा’ रॉकस्टार कमावतो वर्षाला २८१ कोटी रुपये

चाहत्यांचा मनातील खरा रॉकस्टार

प्रसिद्ध गायक एल्विस प्रेस्लीला रॉक संगीताचा बादशाह म्हणून गौरवले जाते. ‘हू मेक्स माय हार्टबीट लाइक थंडर’, ‘डोन्ट बी क्र्युएल’, ‘बर्निंग लव्ह’, ‘ऑल शूक अप’, ‘अ लिटिल कन्वर्सेशन’ यांसारखी शेकडो सुपरहिट गाणी तयार करणाऱ्या एल्विस प्रेस्लीची आज ७५वी जयंती आहे.

रॉक संगीताचा बादशाह एल्विस प्रेस्ली

आपल्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर असताना वयाच्या अवघ्या ४१व्या वर्षी एल्विसचे निधन झाले. मात्र हा सुपरस्टार आजही रसिकांच्या मनात आहे. आज आपल्या समोर केन ब्राऊन, ख्रिस स्टेपलेटन, जेसन एल्डीन यांसारखे शेकडो रॉकस्टार आहेत. ज्यांची दररोज नवनवीन गाणी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु चाहत्यांचा मनातील खरा रॉकस्टार आजही एल्विस प्रेस्लीच आहे.

“माझ्या ‘किरण’वर बनवला चित्रपट”; सलमाननं शाहरुखवर केला आरोप

सलमानला मागे टाकत ‘हा’ ठरला बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

अलिकडेच फोर्ब्सने मृत्यृनंतरही सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. या यादीत एल्विस दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावरुनच त्याच्या आफाट लोकप्रियतेचा आपल्याला अंदाज येतो. मृत्यृनंतरही त्याला दरवर्षी २८१ कोटी रुपये मिळतात. त्याच्या गाण्यांचे हक्क तसेच बँग, सोनी, एम टीव्ही, व्हीएच १, बीटीएम यांसारख्या विविध संगीत कंपन्यांबरोबर केलेल्या करारांतून एल्विसला कोटय़वधींचा नफा मिळतो. शिवाय त्याची अधिकृत वेबसाइट व स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीतून त्याला दरवर्षी १० दशलक्ष अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त आर्थिक नफा मिळतो.

मृत्यृनंतरही ‘मायकल जॅक्सन’चाच दबदबा, ‘फोर्ब्स’नेही घेतली दखल

एल्विसने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जग जिंकले आणि त्यांची जादू मृत्यूनंतरही कायम आहे. त्याच्या या आर्थिक संपत्तीचा वापर विविध सामाजिक संस्था, गरीब लोक व गरजू विद्यार्थांच्या शिक्षणासाठी केला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 1:06 pm

Web Title: elvis presley top earning dead celebrities of 2019 mppg 94
Next Stories
1 Photo : ‘श्वास’ चित्रपटातला चिमुकला आठवतोय? पाहा आता कसा दिसतो
2 भांडी धुण्यासाठी सलमानला मिळाले ६०० कोटी; स्पर्धकाचा दावा
3 ‘शोर युँही ना परींदो ने मचाया होगा…’ हेमंत ढोमेचा मोदी सरकारवर निशाणा
Just Now!
X