25 February 2021

News Flash

आणखी एका कलाकाराची आत्महत्या; २७ व्या वर्षी गोळी घालून संपवलं आयुष्य

एल्विस प्रेस्ली यांचा नातू काळाच्या पडद्याआड

बेंजामिन केओफ आणि त्याची आई लिसा मेरी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

सुपरस्टार गायक एल्विस प्रेस्ली यांचा नातू गायक बेंजामिन केओफ याने आत्महत्या केली आहे. तो केवळ २७ वर्षांचा होता. टीएमझेडने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी १२ जुलै रोजी राहत्या घरी त्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळलेलं नाही.

बेंजामिनची आई गायक लिसा मेरी यांचे मॅनेजर रॉजर विडिनोवस्की यांनी त्याच्या मृत्यूची बातमी दिली. बेंजामिनच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबियांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. लिसा मेरी यांना धक्का सहन न झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अशी माहिती विडिनोवस्की यांनी दिली.

 

View this post on Instagram

 

I have no words… Rest In Peace Benjamin 1992-2020

A post shared by Fan Page (@priscillapresleyelvisfan) on

बेंजामिन केओफ एल्विस प्रेस्ली यांचा एकमेव नातू होता. तो आपल्या आजोबांसारखाच दिसायचा. त्यामुळे अनेक जण त्याला ज्युनिअर एल्विस प्रेस्ली म्हणायचे. बेंजामिन देखील आपल्या आजोबांप्रमाणे एक उत्तम गायक होता. अलिकडेच त्याने एका व्हिडीओ अल्बमसाठी युनिव्हर्सल स्टुडिओसोबत पाच दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा करार केला होता. परंतु हा अल्बम प्रदर्शित होण्याआधीच त्याने आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 6:59 pm

Web Title: elvis presleys grandson benjamin keough dies at 27 mppg 94
Next Stories
1 Video : अमिताभ यांना करोना झाल्याचं कळताच रामदास आठवलेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
2 लॉकडाउनमध्ये प्रवास करणाऱ्या मौनीने केली ‘ही’ चूक; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
3 ‘डॉक्टर डॉन’ची करोना योद्धयांना मदत!
Just Now!
X