‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही सुपरहिट मालिका छोट्या पडद्यावरील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ही मालिका ‘मदर ऑफ ड्रॅगन’ डेनेरिअस टारगेरिअनच्या न्यूड सीन्समुळे विशेष चर्चेत आली होती. डेनेरिअस टारगेरिअन ही व्यक्तिरेखा अभिनेत्री एमेलिया क्लार्क हिने साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हे न्यूड सीन्स तिने चक्क दारु पिऊन केले होते असा खुलासा केला.

एखाद्या मालिकेत सर्वाधिक न्यूड सीन्स देणारी अभिनेत्री म्हणून एमेलिया क्लार्क ओळखली जाते. हिट्स या वेबसाईने घेतलेल्या मुलाखतीत तिला ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील न्यूड सीन्सबाबत विचारण्यात आले. या मुलाखतीत तिने अनेक आश्चर्यचकित करणारे खुलासे केले.

 

View this post on Instagram

 

My Queen @hbo

A post shared by Emilia Clarke (@emiliaclarkee) on

काय म्हणाली एमिलिया?

“निर्मात्यांनी जेव्हा मला या न्यूड दृश्यांबद्दल माहिती दिली, तेव्हा सुरुवातीला मी त्यांना नकार दिला होता. परंतु त्यानंतर निर्मात्यांच्या आग्रहाखातर मी तयार झाले. न्यूड दृश्य चित्रित करण्यापूर्वी मी भरपूर दारु प्यायचे. त्यामुळे सभोवताली कोण आहे आणि काय चालले आहे याचे भान मला रहायचे नाही. अशाच प्रकारे दारुच्या नशेतच मी सर्व न्यूड दृश्य दिले,” असं एमेलियानं म्हटलं आहे.