करोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त आहे. या प्राणघातक विषाणूशी दोन हात करण्यासाठी आता विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी देखील पुढे सरसावले आहेत. त्यांनी आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान अभिनेत्री एमेलिया क्लार्क हिने करोना रुग्णांची मदत करण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे. तिच्यासोबत डेटवर जा आणि करोनाशी लढायला सरकारला मदत करा. अशी एक योजनाच तिने सुरु केली आहे.
‘गेम ऑफ थ्रोन्स’ या सुपरहिट मालिकेतून प्रकाशझोतात आलेली एमेलिया क्लार्क आपल्या चित्रविचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती करोना विषाणूमुळे चर्चेत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या चाहत्यांना तिच्यासोबत व्हर्च्युल डेटवर येण्याचे आवाहन केले आहे.
या डेटसाठी तिला प्रत्येकी दोन लाख ५० हजार पाऊंड्स द्यावे लागतील. या पैशांच्या बदल्यात ती तीन तास चाहत्यासोबत व्हर्च्युअली वेळ घालवणार आहे. डेटिंगमधून जमा होणारे पैसे एमिलिया जागतिक आरोग्य संघटनेला दान करणार आहे. एमेलिया क्लार्कची ही अनोखी कल्पना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी तर तिचे कौतुक देखील केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2020 11:29 am