X

गेम ऑफ थ्रोन्स, दी माव्‍‌र्हलस मि. मिसेल मालिकांची बाजी

‘दी क्राऊन’ या मालिकेतील क्लेअर फॉय हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

एमी पुरस्कार जाहीर

लॉसएंजल्स : यंदाच्या एमी पुरस्कारात ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेला उत्कृष्ट नाटय़मालिकेचा पुरस्कार मिळाला असून नव्याने सुरू झालेल्या ‘दी माव्‍‌र्हलस मि. मेसेल’ या मालिकेने उत्कृष्ट हास्य मालिकेसह अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

गेम ऑफ थ्रोन्स या मालिकेचा आठवा व अखेरचा मोसम पुढील वर्षी असून त्या मालिकेस नऊ, तर मिसेस मेसेल मालिकेस आठ पुरस्कार मिळाले. २०१५ व २०१६ मध्ये पुरस्कार मिळवणाऱ्या एचबीओच्या ‘दी हँडमेडस टेल’ या मालिकेने तिसऱ्यांदा पुरस्काराचा मान  पटकावला आहे.

‘दी क्राऊन’ या मालिकेतील क्लेअर फॉय हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तिचा हा पहिलाच पुरस्कार असून नेटफ्लिक्सच्या क्वीन एलिझाबेथ द्वितीय या मालिकेतून दुसऱ्या मोसमात ती बाहेर पडली होती. आता ती भूमिका ऑलिव्हिया कोलमन करणार आहे.

मि. मेसेल या मालिकेच्या निर्मात्या अ‍ॅमी शेरमन पॅलाडिनो यांनी लेखन व दिग्दर्शन या दोन्ही हास्य मालिकेमध्ये पुरस्कार पटकावण्याचा मान मिळवला. हे पुरस्कार पटकावणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. हास्य मालिकेत राशेल ब्रॉसनॅहन हिला उत्कृष्ट प्रमुख अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

नाटय़ व हास्य मालिका गटात मॅथ्यू ऱ्हाइस, बिल हॅडर यांनी उत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार पटकावले. वेस्टवर्ल्ड मालिकेतील थँडी न्यूटन हिला नाटय़ मालिकेत उत्कृष्ट  सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. नाटय़ मालिकेत पीटर डिंकलेज याने उत्कृष्ट सहभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे.

हास्य मालिकेत अ‍ॅमी बोरस्टेन हिला उत्कृष्ट  सहअभिनेत्रीचा, तर बॅरी या हास्य मालिकेतील भूमिकेसाठी हेन्री विंकलर याला उत्कृष्ट  सहअभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘मी टू व टाइम इज अप’ या दोन्ही मुद्दय़ांचा उल्लेख सतत होत राहीला. कोलिन जोस्ट व मायकेल चे यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण करताना सीबीएसचे प्रमुख लेस्ली मुन्व्हज यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले त्यांचा उल्लेख या वेळी झाला.