09 April 2020

News Flash

‘या’ तीन अभिनेत्रींसोबत इमरान हाश्मी कधीही देणार नाही किसिंग सीन, कारण…

या तीन अभिनेत्रींपैकी दोन आघाडीच्या अभिनेत्री आहेत.

इमरान हाश्मी

अभिनेता इमरान हाश्मीला ‘सिरीअल किसर’ म्हणून ओळखलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये त्याची प्रतिमा हळूहळू बदलताना पाहायला मिळत आहे. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ आणि ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटांमधून इमरानच्या अभिनयाची एक नवीन बाजू प्रेक्षकांना पाहता आली. सुरुवातीच्या काळात इमरानने त्याच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये किसिंग सीन दिले होते. परंतु बॉलिवूडमधील तीन अभिनेत्रींसोबत तो कधीही हा सीन देणार नसल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. यामागचं कारणसुद्धा त्याने सांगितलं होतं.

इमरानने अभिनेत्री आलिया भट्टसोबत कधीही किसिंग सीन देणार नसल्याचं सांगितलं. यामागे चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट कारण आहेत. इमरान आणि महेश भट्ट यांच्यात चांगली मैत्री असून महेश भट्ट यांच्या बऱ्याचशा चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. महेश भट्ट यांच्यामुळेच इमरान कलाविश्वात पदार्पण करु शकला. त्यामुळे तो महेश भट्टांचा कायम आदर करतो आणि आलियाला बहीण मानतो. आलियाला बहीण मानत असल्यामुळे तिच्यासोबत किसिंग सीन करणं योग्य नसल्याचं म्हणत त्याने तिच्यासोबत असे सीन करणार नसल्याचं सांगितलं.

View this post on Instagram

☂️

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt) on

त्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतसोबत देखील कधीच किसिंग सीन देणार नसल्याचं त्याने स्पष्टपणे सांगितलं. कंगना बऱ्याच वेळा सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य, कलाकारांवर ताशेरे ओढत असते. त्यामुळे कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांसोबत तिचं जमत नाही. या यादीमध्ये इमानचंदेखील नाव येतं. कंगना आणि इमरानमध्ये काही कारणामुळे वाद झाले होते. त्यानंतर तिच्यासोबत किसिंग सीन देणार नसल्याचं इमरानने सांगितलं. झरीन खान आणि इमरान एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे तिच्यासोबत किसिंग सीन देणं मला योग्य वाटत नाही, असं तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 9:48 am

Web Title: emraan hashmi refused to kiss these three actresses here is why ssv 92
Next Stories
1 Coronavirus : प्रकाश राज यांनी राखलं परिस्थितीचं भान; स्टाफला केली आर्थिक मदत
2 “कनिकाला शौचालयात बंद करा”; अभिनेत्यानं केली वादग्रस्त मागणी
3 मालिकांमधून होणार करोनाविषयी जनजागृती; ‘वैजू नंबर वन’मध्ये या खास भागाचा समावेश
Just Now!
X