07 July 2020

News Flash

कॅन्सरशी यशस्वी झुंज देणाऱ्या अयानने मानले बॉलीवूडकरांचे आभार

अयानचा हा संदेश अनेक बॉलीवूडकरांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

Emraan Hashmi : तुम्ही केलेल्या प्रार्थना आणि प्रेमासाठी धन्यवाद, असे अयानने या संदेशात म्हटले आहे.

अभिनेता इम्रान हाश्मी याचे ‘द किस ऑफ लाईफ: हाऊ अ सुपरहिरो अँड माय सन डिफिटेड कॅन्सर’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. या पुस्तकात इम्रानने त्याचा सहा वर्षांचा मुलगा अयान याच्या कॅन्सरवरील उपचारादरम्यानचे अनुभव आणि प्रसंग कथन केले आहेत. अजय देवगण, फरहान अख्तर, सोनाली बेंद्र आणि बिपाशा बासू यांसारख्या अनेक बॉलीवूड स्टार्सनी या पुस्तकाचे कौतूक केले आहे. यानंतर अयानने पुस्तकाचे कौतूक करणाऱ्या सर्व बॉलीवूडकरांना स्वत:च्या हाताने लिहलेला संदेश पाठवून त्यांचे आभार मानले आहेत. तुम्ही केलेल्या प्रार्थना आणि प्रेमासाठी धन्यवाद, असे अयानने या संदेशात म्हटले आहे. अयानचा हा संदेश अनेक बॉलीवूडकरांनी ट्विटरवर शेअर केला असून इम्रान आणि अयानचे भरभरून कौतूक केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2016 8:48 am

Web Title: emraan hashmi son sends thank you note to bollywood for the kiss of life
Next Stories
1 भाच्याच्या संगोपनाची सलमानला काळजी, मदतनीसांच्या घेतल्या मुलाखती
2 कान चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्रातून रिंगण, हलाल आणि वक्रतुंड महाकाय
3 ‘नोटीस मागे घे नाहीतर..’, कंगनाचा हृतिकला निर्वाणीचा इशारा
Just Now!
X